Shaheen Afridi  esakal
क्रीडा

Shaheen Afridi PCB Crisis : पाकिस्तानच्या कॅप्टन्सीचा वाद टिपेला, पीसीबीनं छापलं शाहीनचं खोटं वक्तव्य?

अनिरुद्ध संकपाळ

Shaheen Afridi PCB Crisis : पाकिस्तान क्रिकेट वर्तुळातील कर्णधारपदावरून उठलेलं वादंग आता वेगळ्या दिशेला जात आहे. काही महिन्यावरच टी 20 वर्ल्डकप आहे अन् पीसीबीने शाहीन आफ्रिदीला टी 20 संघाच्या कर्णधारपदावरून हटवलं आहे. बाबर आझम पुन्हा एका कर्णधार झालाय. मात्र शाहीन आफ्रिदी पीसीबीने हे प्रकरण ज्या प्रकारे हाताळले त्यावर नाराज आहे.

पीसीबीनं शाहीनचं खोटं वक्तव्य छापलं?

बाबर आझमला पुन्हा एकदा टी 20 संघाचा कर्णधार केल्यानंतर पीसीबीच्या वेबसाईटवर शाहीनचं एक वक्तव्य प्रसिद्ध केलं होतं. या वक्तव्यानंतरच शाहीन आफ्रिदी नाराज झाल्याचं सूत्रांनी सांगितले. या वक्तव्यात शाहीन आफ्रिदीने बाबर आझमला पुन्हा टी 20 चा कर्णधार करण्याला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे.

मात्र शाहीननं असं कोणतंही वक्तव्य दिलेलं नाही. या वक्तव्यातील पाकिस्तानचं नेतृत्व करायला मिळणं हा सन्मान अन् बाबर आझमला संपूर्ण पाठिबा यावर शाहीनचा आक्षेप आहे.

शाहीनला पीसीबीकडून हवं उत्तर

इएसपीएल क्रिकइन्फोला एका विश्वसनीय सूत्राने सांगितले की, शाहीनचे चुकीचे वक्तव्य प्रसिद्ध केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. शाहीन याबाबत सार्वजनिकरित्या काहीतरी बोलेल असं पीसीबीला वाटतं म्हणून त्यांनी डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांनी शाहीनसोबत तातडीची बैठक बोलावली होती. याचबरोबर आज पीसीबी चेअरमन मोहसीन नक्वी हे देखील शाहीनसोबत बैठक करणार आहेत.

पाकिस्तान क्रिकेट संघात संवादाचा अभाव

आफ्रिदीची नाराजी ही खोट्या वक्तव्याच्या पलीकडील आहे. शाहीनला असं वाटतं की पीसीबीने त्याला कर्णधारपदावरून का हटवलं याचं योग्य स्पष्टीकरण दिलेलं नाही. पीसीबीकडून स्पष्ट असा संवाद साधण्यात आला नाही. त्यामुळे संघात परस्पर विश्वासाचा अभाव आणि नैराश्य आलं आहे.

पीसीबीचे फासे उलटे पडले

पीसीबीने नव्या निर्णयाविरूद्ध संघात कोणतीही नाराजी नसल्याचं भासवण्यासाठी खोटं वक्तव्य प्रसिद्ध केलं. या वक्तव्यावरून बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांच्यात कोणतीही कटूता नाही असं दाखवण्याचा प्रयत्न झाला. मात्र हा प्रयत्न त्यांच्यावरच उलटला. पाकिस्तान क्रिकेटच्या दोन स्टार खेळाडूंमधील नातं अजूनच ताणलं गेलं आहे.

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paris Knife Attack: पॅरिस हादरलं! गर्भवती महिलेसह तिघींवर चाकूहल्ला; आरोपीचा धक्कादायक दावा, म्हटला "मला अल्लाहने पाठवलं"

PM Modi Video Meta Apology : गलतीसे मिस्टेक! PM मोदींचा व्हिडिओ भारतात ब्लॉक, मेटाने चूक कबूल करत मागितली माफी

Latest Live Updates Marathi : CJP आंदोलनात अन्न पुरवठा करणारा स्वयंसेवक जुनैदची सर्वोच्च न्यायालयात धाव

Mumbai News: तुम्ही जनतेची सेवा करण्यासाठी आहात, मग त्यांना मारहाण का करता? उच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंच्या नेत्याला फटकारले

'भेटली तू पुन्हा' च्या सिक्वेलची घोषणा! प्रेक्षक खुश, मुख्य भूमिकेत झळकणार 'हे' कलाकार

SCROLL FOR NEXT