Ravichandran Ashwin on Shaheen shah Afridi sakal
क्रीडा

IPL मध्ये असता तर, करोडपती असता; आर अश्विनचं पाक खेळाडूबाबत विधान

मी खूप विचार केला की जर हा पाक खेळाडू आयपीएल लिलावात असता तर किती रुपये मिळाले असते.

Kiran Mahanavar

Ravichandran Ashwin on Shaheen shah Afridi : भारतीय आणि पाकिस्तानी क्रिकेट संघ सध्या UAE मध्ये आशिया कप खेळत आहेत. दोन्ही संघ सध्या दुखापतींनी त्रस्त झाले आहेत. भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू दुखापतीमुळे सातत्याने संघातून बाहेर पडत आहेत. पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि भारताचा जसप्रीत बुमराह जखमी झाला आहे. त्यानंतर पाकिस्तानी मोहम्मद वसीम ज्युनियर आणि आता भारतीय रवींद्र जडेजाही स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

भारताने पाकिस्तानचा पहिला सामन्यात 5 विकेट्सने पराभव केला. आता या संघांमधील दुसरा सामना रविवारी (४ सप्टेंबर) होणार आहे. याआधीही भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर जखमी पाकिस्तानी वेगवान गोलंदाजावर काही कमेंट्स केल्या आहेत. शाहीनच्या दुखापतीबद्दल आणि पाकिस्तानच्या इतर गोलंदाजांबद्दल अश्विन म्हणाला, गेल्या वेळी आम्ही पाकिस्तानचा सामना केला तेव्हा शादाब खान आणि हरिस रौफ यांनी चांगली गोलंदाजी केली होती, परंतु शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीने खेळ बदलला. आफ्रिदीची दुखापत हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का आहे.

'IPL लिलावात शाहीन आफ्रिदी असती तर...'

भारतीय फिरकीपटू म्हणाला, मी खूप विचार केला की जर शाहीन आफ्रिदी आयपीएल लिलावात असता तर किती रुपये मिळाले असते. एक उंच डावखुरा वेगवान गोलंदाज जो नवीन चेंडूने गेम सेट करतो आणि डेथ ओव्हरमध्ये यॉर्कर देखील टाकतो. आयपीएल लिलावात तो असता तर 14-15 कोटींमध्ये गेला असता. मला वाटत नाही की जगातील कोणत्याही संघात अशी बॉलिंग लाइनअप असेल, ज्यामध्ये प्रत्येक बॉल 140-145 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

Nepal Flood Alert : नेपाळच्या महापुरात नाशिकचे पर्यटक अडकले? जिल्हा प्रशासनाकडून तातडीने हेल्पलाइन क्रमांक जारी, पाहा लिंक आणि कंट्रोल रूम नंबर

‘I Love My बायको! रितेश असं बोलला तरी जेनिलिया रुसली, दोघांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT