Shakib Twitter
क्रीडा

Video : अंपायरसमोर स्टंटबाजी! क्रिकेटरवर झाली कारवाई

सुशांत जाधव

बांगलादेश संघाचा स्टार ऑलराउंडर शाकिब अल हसन याला मैदानात राग व्यक्त करणं चांगलेच महागात पडले आहे. ढाका प्रीमियर लीग (DPL) मधील टी 20 सामन्यात शाकिबने स्टंप्सवर लाथ मारल्याचे पाहायला मिळाले होते. रागाच्या भरात केलेल्या या कृत्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आलीये. याप्रकरणाची त्याने माफी मागितली. तरीही त्याला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. अंपायरसोबत केलेल्या गैरवर्तनूक त्याला महागात पडलीये. (shakib-al-hasan-banned-for-the-4-matches-in-the-dpl-due-to-his-behaviour-to-the-umpire)

BDCricTime च्या वृत्तानुसार, शाकिब याच्यावर चार सामन्यांची बंदी घालण्यात आलीये. शनिवारी ढाका मट्रोपोलिस क्रिकेट समितीने त्याच्यावर ही कारवाई केली. शेर-ए-बंगाल स्टेडियमवर शुक्रवारी रंगलेल्या अबाहानी लिमिटेड आणि मोहम्मडन स्पोर्टिंग यांच्यातील सामन्यात शाकिबने अशोभनिय कृत्य केले होते. यासामन्यात एकदा नव्हे तर दोनवेळा शाकिबने गैरवर्तन केल्याचे पाहायला मिळाले होते. मुश्फिकीर रहीम याच्या विरोधात पायचितची अपील नाकारल्यानंतर मोहम्मडन स्पोर्टिंगचा कर्णधार शाकिबने स्टंपवर लाथ मारली. एकदा नव्हे तर दोनवेळा त्याने असा प्रकार केला.

अबाहानी लिमिटेडच्या डावातील 6 व्या षटकातील पाचव्या चेंडूनंतर सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. दोन्ही पंचांनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी शाकिबने रागाने स्टंम्प पाडल्याचे पाहायला मिळाले. यासामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार शाकिबच्या मोहम्मडन स्पोर्टिंगने अबाहानी लिमिटेडला पराभूत केले. पण सोशल मीडियावर शाकिबचे अखिलाडू वृत्तीची चर्चा चांगलीच रंगलीय. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होत आहे.

शाकिबने आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली आहे. तणावपूर्ण वातावरणात जे काही झाले ते चुकीचे होते, असे म्हणत त्याने माफीनामा दिला होता. शाकिबच्या पत्नीनेही यावर प्रतिक्रिया दिली. अंपायरने दिलेला निर्णयावर आक्षेप घेत शाकिबच्या पत्नी उम्मे अहमद शिशिर हिने त्याची बाजू घेतली आहे. तिने फेसबुकवरुन पतीला विलन ठरवू नका, असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

Successful Investment: बाबो! ही महिला चक्क पार्किंगमधून कमावते लाखो रुपये; नेमका काय आहे बिझनेस?

अंतराळात तयार होणार स्कॉच व्हिस्की! कुणाला प्यायला मिळणार? ‘स्पेस पफिन’ मिशन नेमकं काय?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

FDA Action: खाद्यतेलाच्या साठ्यांवर छापा, 'एफडीए'च्या कारवाईत १.२८ कोटींचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT