IND vs BAN esakal
क्रीडा

IND vs BAN : बांगलादेशची शेपूट वळवळली; भारतासमोर ठेवलं तगडं आव्हान

अनिरुद्ध संकपाळ

IND Vs BAN : भारताने बांगलादेशला सुरूवातीला धक्के दिले. मात्र त्यानंतर कर्णधार शाकिब अल हसनने 80 धावा करत डाव सावरला. यानंतर तोहिदने 54 धावा तर तळातील फलंदाज नसुम अहमदने 44 धावा करत भारतासमोर 265 धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून शार्दुल ठाकूरने 3 तर मोहम्मद शमीने 2 विकेट्स घेतल्या.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात प्रथम गोलंदाजी करत भारताने बांगलादेशला सुरूवातीलाच धक्के दिले. शमी आणि शार्दुलने बांगलादेशची अवस्था 3 बाद 28 धावा अशी केली होती.

मात्र त्यानंतर शाकिबने दमदार फलंदाजी करत बांगलादेशचा डाव सावरला. त्याने आधी मेहदी हसन मिराजसोबत भागीदारी रचण्यास सुरूवात केली. मात्र ही जोडी अक्षर पटेलने फोडली. मिराज 13 धावांवर बाद झाला.

यानंतर शाकिबने अर्धशतक पूर्ण करत तोहिद सोबत शतकी भागीदारी रचली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी रचली. अखेर ही जोडी शार्दुल ठाकूरने फोडली. त्याने 80 धावांवर खेळणाऱ्या शाकिबला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

शाकिब बाद झाल्यानंतर आलेला शमिम हुसैन देखील 1 धावांची भर घालून माघारी परतला. यानंतर तोहिदने आपले अर्धशतक पूर्ण करत संघाला देखील द्विशतकाजवळ पोहचवले. मात्र त्याला शमीने 54 धावांवर बाद करत मोठा धक्का दिला.

बांगलादेशच्या 7 विकेट्स गेल्यानंतर भारत शेपूट लवकर गुंडाळेल असे वाटत होते. मात्र नसुम अहमद आणि महदी हसन यांनी भारतीय गोलंदाजांना चांगलेच चोपले. अहमदने 44 धावांचे योगदान दिले. त्याला हसनने 29 धावांचे योगदान देत बांगलादेशला 265 धावांपर्यंत पोहचवले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT