Shakib Al Hasan All Time ODI XI  Twitter
क्रीडा

Hasan All Time ODI XI : सचिनला पाकिस्तानी पार्टनर; धोनी कॅप्टन

भारतीय संघाला आयसीसीच्या सर्व ट्रॉफ्या जिंकून देणाऱ्या महेंद्र सिंग धोनीला त्याने कॅप्टन म्हणून पसंती दिलीये.

सुशांत जाधव

Shakib Al Hasan Picks His All Time ODI XI : बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन याने आपली बेस्ट ऑल टाईम इलेव्हन (best all-time ODI eleven) निवडलीये. भारतीय संघाला आयसीसीच्या सर्व ट्रॉफ्या जिंकून देणाऱ्या महेंद्र सिंग धोनीला त्याने कॅप्टन म्हणून पसंती दिलीये. धोनीशिवाय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीच्याही त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश आहे.

बांगलादेशच्या अष्टपैलूनं पाकिस्तानचा माजी फलंदाज सईद अन्नवर आणि सचिन तेंडुलकरला सलामीची जोडी म्हणून पसंती दिली आहे. वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज क्रिस गेलला त्याने चौथ्या तर विराट कोहलीला चौथ्या क्रमांकाला स्थान दिले आहे. शाकिबच्या ऑल टाईम इलेव्हनमध्ये दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेट जॅक कॅलिसला पाचव्या तर धोनीला सहाव्या स्थानावर पसंती देण्यात आलीये. तर स्वत:ला त्याने सातव्या क्रमांकावर ठेवले आहे.

गोलंदाजांमध्ये श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन, पाकिस्तानचा वासीम जाफर, ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्न आणि मेग्रा या दिग्गजांचा समावेश आहे. या चार गोलंदाजांनी मिळून वनडेत 1700 विकेट घेतल्या आहेत.

शाकिब अल हसनची ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन

सचिन तेंडुलकर, सईद अन्वर, क्रिस गेल, विराट कोहली, जॅक कॅलिस, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकिपर), शाकिब अल हसन, मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न, वासीम अक्रम, ग्लेन मेग्रा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची हत्या, मध्यरात्री घडलेल्या हत्याकांडाने खळबळ

Pune Traffic : पुणे-बंगळूर सेवा रस्त्यांची बिकट अवस्था! खड्ड्यांमुळे नागरिक, वाहनचालक त्रस्त; पावसाळ्यात धोकादायक स्थिती

Anurag Thakur: देशात अस्थिरता निर्माण करण्याचा कट; भाजप नेते अनुराग ठाकूर यांच्याकडून राहुल यांच्या टीकेचा समाचार

लग्न ठरत नाही म्हणून ढसाढसा रडली स्वानंदी, प्रोमो पाहून प्रेक्षक हळहळले "या तिच्या खऱ्या भावना"

VIDEO VIRAL: श्रद्धाने दिली प्रेमाची कबुली, बॉयफ्रेंडला टॅग करत म्हणाली... 'हे नखरे सहन करु शकतो का?' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT