shane watson virat kohli sakal
क्रीडा

Asia Cup 2022: शेन वॉटसनचा मोठा दावा, म्हणाला- कोहली धमाकेदार कामगिरी करेल, कारण...

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत तो निश्चितच ठसा उमटवेल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन याने व्यक्त केला

Kiran Mahanavar

Shane Watson on Virat Kohli : महिनाभराच्या विश्रांतीनंतर विराट कोहली शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पुन्हा सक्षम झाला असेल आणि आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत तो निश्चितच ठसा उमटवेल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन याने व्यक्त केला आहे.

काही वर्षांपूर्वी गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून फलंदाजीत सातत्य राखणारा कोहली आता फॉर्मसाठी कमालीचा झगडत आहे. नोव्हेंबर २०१९ नंतर त्याला एकही आंतरराष्ट्रीय शतक करता आलेले नाही. आता वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकांतून विश्रांती घेणारा विराट कोहली आता आशिया करंडक स्पर्धेसाठी सज्ज होत आहे.

क्रिकेटच्या मानसिकतेपासून दूर रहाणारी महिनाभराची ही विश्रांती विराटसाठी शारीरिक आणि मानसिकता अधिक भक्कम करण्याकरिता निश्चितच फायदेशीर ठरेल. असे सांगून वॉटसन पुढे म्हणाला, धावा होत नसल्यामुळे विराटची ऊर्जा कमी झालेली वाटत होती. आयपीएलमध्येही तो मानसिकदृट्या थकलेला दिसून येत होता.

ब्रेकवर जाण्यापूर्वी विराट

कोहली इंग्लंडविरुद्ध खेळला होता. या दौऱ्यातील सर्व प्रकारांतील सहा सामन्यांत मिळून त्याला ७६ धावाच करता आल्या होत्या. आशिया करंडक स्पर्धा ही आगामी विश्वकरंडक स्पर्धेची नांदी आहे. त्यामुळे येथे चांगल्या धावा केल्या आणि फॉर्म मिळवला तर याचा फायदा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वककरंडक स्पर्धेत होईल. विराट हा महान फलंदाज आहे आणि तो लवकरात लवकर फॉर्ममध्ये येणे ही काळाची गरज आहे, असेही वॉटसन म्हणाला.

शेन वॉटसन आणि विराट कोहली आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघातून खेळलेले आहे त्यामुळे वॉटसन कोहलीची क्षमता जवळून ओळखून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd ODI Live : धो धो पाऊस सुरू झाला... भारताच्या झाल्यात ७ बाद ११३ धावा; सामना आता रद्द झाला तर जिंकणार कोण?

Sakal Lit Fest 2026: ‘सकाळ लिट फेस्ट’ १२ नोव्हेंबरपासून;बुकर विजेत्या बानू मुश्ताक यांच्या हस्ते उद्‍घाटन

''अजितदादांच्या निधनानंतर सुनील तटकरेंना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थखातं पाहिजे होतं'', आमदार महेंद्र थोरवेंचा गंभीर आरोप

Mumbai News: सरकारला न्यायालयाचा दणका, खासगी प्रकल्पासाठी 'टाटा'च्या जमीन संपादनाचा निर्णय रद्द

Latest Marathi News Live Update: तटकरेंना उपमुख्यमंत्रीपद, अर्थखातं हवं होत; महेंद्र थोरवे यांचा मोठा दावा

SCROLL FOR NEXT