Dravid And Dhavan Sakal
क्रीडा

युवांच्या गर्दीत द्रविड 'दर्दी गब्बर'ला देणार शेवटची संधी

व्यंकटेश अय्यरचे स्थान पक्के, ऋतूराज गायकवाडच काय होणार?

सुशांत जाधव

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील वनडेसाठी रोहितच्या नेतृत्वाखाली कोणत्या खेळाडूंना संधी द्यावी? हा पेच बीसीसीआयच्या निवड समितीसमोर असेल. अनुभवी फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि युवा फलंदाज ऋतूराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांच्यापैकी कोणाला संधी द्यायची? हा तिढा निवड समितीला सोडवावा लागणार आहे. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करुन आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या व्यंकटेश अय्यरला (Venkatesh Iyer) वनडे संघात स्थान मिळणे जवळपास निश्चित आहे.

जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेपासून रोहित शर्मा भारतीय वनडे संघाचे नेतृत्व करताना दिसेल. टी-20 आणि कसोटीनंतर मार्गदर्शक म्हणून द्रविडसाठी पहिली मालिका असेल. बायोबबल आणि वर्कलोड याचा विचार करुन किती खेळाडूंची निवड होणार याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

ऋतूराज गायकवाड की शिखर धवन?

महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणाऱ्या ऋतूराज गायकवाडने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करुन दाखवली होती. या स्पर्धेत सर्वाधिक धाव करुन त्याने पर्पल कॅपवर कब्जा केला होता. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतही तो दमदार कामगिरी करताना दिसतोय. वनडे संघ निवडताना अधिक पर्याय उपलब्ध असणं रोहित, द्रविड आणि संघ व्यवस्थापनासाठी डोकेदुखी ठरु शकते. ऋतूराज गायकवाडने श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण त्याला अद्याप वनडेत संधी मिळालेली नाही. न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेतही ऋतूराजला संधी मिळाली नव्हती. कारण इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी डावाला सुरुवात केली होती. दुसऱ्या बाजूला अनुभवी धवनची या दरम्यानची कामगिरी निराशजनक राहिली आहे. तो धावांसाठी संघर्ष करताना दिसते.

...म्हणून संघर्ष करणाऱ्या धवनला मिळू शकते संधी

भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने कसोटीमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा या अनुभवी खेळाडूंना संधी दिल्याचे पाहायला मिळाले आहे. द्रविडच्या या कॅलक्युलेशननुसार, दक्षिण आफ्रिका दौऱ्यात शिखर धवनला संधी मिळू शकते. बीसीसीआयच्या एका सूत्राने यावर भाष्य केले आहे. रहाणे आणि इशांत शर्माप्रमाणे भारतीय संघाचा प्रशिक्षक द्रविड सलामीवीर शिखर धवनला अखेरची संधी देऊ शकतो.

व्यंकटेश अय्यरचे स्थान पक्के

पीटीआयने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाले दिलल्या वृत्तानुसार, विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सातत्याने धावांची बरसात करणाऱ्या व्यंकटेश अय्यरचे वनडेतील स्थान जवळपास निश्चित आहे. त्याच्याकडे हार्दिक पांड्याच्या पर्याय म्हणून पाहिले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT