Shikhar Dhawan Ayesha Divorce esakal
क्रीडा

Shikhar Dhawan Divorce : प्रसिद्ध क्रिकेटपटू शिखर धवनच्या वैवाहिक नात्याला 'सुरुंग'! घटस्फोट मंजूर, पत्नीकडूनच व्हायचा छळ

भारतीय क्रिकेट संघातील प्रसिद्ध फलंदाज शिखर धवनबाबत एक धक्कादाय बातमी समोर आल्याचे दिसून आले आहे.

युगंधर ताजणे

Shikhar Dhawan Ayesha Divorce : भारतीय क्रिकेट संघातील प्रसिद्ध फलंदाज शिखर धवनबाबत एक धक्कादायक बातमी समोर आल्याचे दिसून आले आहे. या खेळाडूच्या वैवाहिक नात्यात मोठी खळबळ उडाल्याचे सांगण्यात येत आहे. शिखर धवन आणि त्याची पत्नी आयशा यांचे वैवाहिक नाते संपुष्टात आले आहे.

दिल्लीच्या कौटूंबिक न्यायालयानं शिखर आणि आयशाचा घटस्फोट मंजूर केला आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या वैवाहिक नात्यात कुरबूर सुरु होती. त्यावरुन त्यांनी कोर्टामध्ये घटस्फोटाचा अर्जही दाखल केला होता. अखेर हे दोन्ही सेलिब्रेटी वेगळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे शिखर धवनच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

नऊ वर्षापासून शिखर धवन आणि आयशा यांचा संसार सुरु होता. मात्र त्या संसाराला घरघर लागल्याचे दिसून आले. शिखरनेच तिच्याविरोधात दिल्ली कौटुंबिक कोर्टात धाव घेतली होती. त्या अर्जामध्ये असे म्हटले होते की, आयशाकडून शिखरचा मानसिक छळ होत होता. त्यामुळे समुपदेशानंतरही त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा समेट घडून आला नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

या सगळ्या प्रकारात शिखरनं त्याच्या नऊ वर्षाच्या मुलाची कस्टडी मागितली आहे. त्यामध्ये त्यानं आतापर्यत आपला जो मानसिक छळ झाला त्याविषयी देखील उल्लेख केला आहे. शिखरच्या या निर्णयानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे दिसून आले आहे. भारतीय क्रिकेटविश्वात याची चर्चा आता मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिखरच्या पत्नीच्याविरोधात एकदा पोलिसांकडे तक्रारही दाखल करण्यात आली होती. शिखर आणि आयशा यांना एक मुलगा असून त्याचे नाव झोरावर आहे. आयशा शिखरपेक्षा दहा वर्षाने मोठी आहे. आयशाचा हा शिखर धवनशी दुसरा विवाह होता. आयशाला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीएसटीच्या नियमांमध्ये होणार मोठा बदल, आता विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा खरेदीदाराला नाही, विधी समितीने 'त्या' प्रस्तावाला दिली मंजुरी

Kothrud Assault: कोथरूडमध्ये जुन्या वादातून तरुणावर स्टंपने बेदम मारहाण; मध्यस्थ नागरिकांनाही धमक्या

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

Marathi Books: इतिहास, कविता, धर्म आणि काश्मीर सफर; चार नवी पुस्तके.. वाचनविश्वात नव्या पानांची भर

गडचिरोलीत पुन्हा माओवादी हालचालींची चाहूल? कुंडमजवळ बॅनर-पत्रके आढळली; नेमकं काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT