Shikhar Dhawan Disappointed not to get the Century In 1st ODI Against West Indies esakal
क्रीडा

Shikhar Dhawan : भारताने सामना जिंकला तरी कर्णधार शिखर धवन निराश

अनिरुद्ध संकपाळ

पोर्ट ऑफ स्पेन : भारताने वेस्ट इंडीज विरूद्धचा (West Indies Vs India) पहिला वनडे सामना अवघ्या 3 धावांनी जिंकला. या विजयाबरोबरच भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली. भारताकडून कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) दमदार फलंदाजी करत 97 धावांची खेळी केली. त्याचे शतक अवघ्या (Century) तीन धावांनी हुकले. मात्र या विजयानंतर देखील शिखर धवन निराश आहे.

भारताने वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी 309 धावांचे आव्हान ठवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजकडून कायल मायेर्स आणि ब्रँडन किंग यांनी अर्धशतकी खेळी केली. मात्र मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर पुन्हा वर्चस्व मिळवले. अखेर भारताने पहिला सामना 3 धावांनी जिंकला. या सामन्याचा सामनावीर म्हणून 97 धावांची खेळी करणाऱ्या शिखर धवनची निवड करण्यात आली.

दरम्यान, सामन्यानंतर झालेल्या कार्यक्रमात शिखर धवन म्हणाला की, 'शतक साजरे करता आले नाही यामुळे मी निराश आहे. मात्र एकूण हा एक सांघिक प्रयत्न होता. आम्ही एक चांगली धावसंख्या उभारली होती. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक झाला. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल असे वाटले नव्हते. आम्ही दबावाच्या स्थितीत शांत राहिलो. आम्ही फाईन लेग मागे ठेवत एक छोटा बदल केला. त्याचा चांगला फायदा झाला. मैदानाच्या मोठ्या बाजूचा जास्तीजास्त वापर करून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही आमची शिकण्याची प्रक्रिया कायम ठेवणार असून येणाऱ्या सामन्यात अजून चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू.'

भारताने पहिल्या सामन्यात 50 षटकात 7 बाद 308 धावा केल्या होत्या. त्यात शिखर धवन (97), शुभमन गिल (64) आणि श्रेयस अय्यर (54) यांचे मोठे योगदात होते. विंडीजकडून गुडाकेश मोटियेने 54 धावात 2 विकेट घेतल्या. भारताचे 309 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कायल मायेर्सने (75) तर ब्रँडन किंग (54) यांना अर्धशतकी खेळी करत विंडीजला चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर अकील हुसेनने नाबाद 32 आणि रोमारियो शेफर्ड ने 39 धावांची खेळी करत सामन्यात रंगत आणली. मात्र भारताने सामना 3 धावांनी जिंकला. भारताकडून मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

ANAYA BANGAR: "माझं क्रिकेट संपलं वाटलेलं, पण अनाया बांगर हिचं मैदानात दमदार पुनरागमन! 'या' देशाने दिला ग्रीन सिग्नल, महिला लीग गाजवणार?

SCROLL FOR NEXT