Shikhar Dhawan Divorce Ayesha Mukherjee-spoke-on-remarriage  
क्रीडा

Shikhar Dhawan : 'विचार न करता केले लग्न आता...' बायकोसोबत घटस्फोटावर धवनने तोडले मौन

सकाळ ऑनलाईन टीम

Shikhar Dhawan Divorce Ayesha Mukherjee : भारताचा सलामीवीर शिखर धवन गेल्या काही वर्षांपासून पत्नी आयेशा मुखर्जीपासून वेगळा राहत आहे. दोघांच्या वेगळ्या होण्याच्या बातम्या गेल्या 2 वर्षांपासून चर्चेत होत्या, मात्र अद्याप दोघांनीही यावर कोणतेही वक्तव्य केले नव्हते. आता बऱ्याच काळानंतर शिखर धवनने घटस्फोटावर मौन सोडले आहे. त्यांचं नातं तुटण्यामागचं कारणही त्यांनी सांगितलं. एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत धवनने त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगितले.

भारतीय स्टारने कबूल केले की, तो त्याच्या संसारात अयशस्वी झाला, परंतु कोणाकडे बोट दाखवू इच्छित नाही कारण त्याने घेतलेला निर्णय स्वतःचा होता. लग्नातील अपयशामागचे कारण सांगताना त्याने नाते चालवण्याचा अनुभव नसल्याचे सांगितले.

धवन म्हणाला, तो आज क्रिकेटबद्दल जे बोलतो ते 20 वर्षांपूर्वी करू शकलो नसतो. हे सर्व अनुभवातून येते. जेव्हा मी 26-27 वर्षांचा होता तेव्हा सतत खेळत होता आणि त्यावेळीस कोणत्याही रिलेशनशिपमध्ये नव्हतो. फक्त मौजमजा करायचा, पण प्रेमात पडल्यावर मला मुलगी समजली नाही. आज जर मी प्रेमात असेल तर समजू शकलो असतो.

धवनने पुनर्विवाहाबाबतही चर्चा केली. तो म्हणतो की, आता गोष्टी समजल्या आहेत. जर मी दुसरे लग्न केले तर पहिल्याची चूक करणार नाही. आता मला माहित आहे की कोणत्या प्रकारची मुलगी हवी आहे. मला आता एका मुलीची गरज आहे जिच्यासोबत मी आयुष्य घालवू शकेल. धवन आणि आयशाबद्दल बोलायचे झाले तर 2012 मध्ये त्यांचे लग्न झाले. आयशा आधीच घटस्फोटित होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT