Shikhar Dhawan IND vs NZ 3rd ODI
Shikhar Dhawan IND vs NZ 3rd ODI esakal
क्रीडा

Shikhar Dhawan : न्यूझीलंड दौऱ्याची सांगता होताच धवनचे बांगलादेश दौऱ्याबाबत मोठे वक्तव्य

अनिरुद्ध संकपाळ

Shikhar Dhawan IND vs NZ 3rd ODI : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिका आज संपुष्टात आली. मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. न्यूझीलंडलने पहिला सामना जिंकल्यामुळे मालिका त्यांच्या नावावर झाली. मालिका गमावल्यानंतर भारताचा कर्णधार शिखर धवनने आपल्या संघाबाबत आणि वनडे वर्ल्डकपसाठी भारतीय संघाच्या तयारीबाबत देखील आपले मत व्यक्त केले.

शिखर धवन सामन्यानंतर म्हणाला की, 'बागंलादेशच्या दौऱ्यावर संघात वरिष्ठ खेळाडू परतणार आहे. वर्ल्डकपच्या तयारीसाठी बांगलादेश दौरा अधिक व्यवहारिक आहे.' धवनला संघातील युवा खेळाडूंबद्दल विचारण्यात आले त्यावेळी तो म्हणाला की, 'सामन्यादरम्यान चेंडू कोठे टाकायचा त्याची लाईन आणि लेंथ कशी ठेवायची आहे या गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. आमचा संघ युवा आहे. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करणे शिकावे लागेल. आम्ही खूप शॉर्ट बॉल टाकले.'

शिखर धवन फलंदाजीबाबत म्हणाला की, 'ज्यावेळी परिस्थिती अनुकूल नसते त्यावेळी आम्हाला भागीदारी रचण्यावर भर द्यायला हवा होता.' धवन पुढे म्हणाला की, 'आम्ही ज्यावेळी क्रिकेट खेळतो त्यावेळी आपल्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करायला हवा. पावसाच्या व्यत्यामुळे बाधित झालेल्या सामन्यात देखील आम्ही चांगली कामगिरी केली. आम्हाला माहिती होते की 20 षटकानंतरच सामन्याचा निकाल लागणार आहे. गेल्या काही आठवड्यापासून याच वातावरणात आम्ही खेळत आहोत.'

हेही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Result: 'या' मतदारसंघात जो पक्ष विजयी होतो तोच देशावर राज्य करतो; जाणून घ्या देशभरातील खास जागांची जादू

मुख्यमंत्र्यांपासून माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीपर्यंत मतमोजणीपूर्वीच 'या' राज्यात BJP 10 जागांवर विजयी; वाचा, नेमका काय आहे प्रकार

T20 World Cup 2024 : आजपासून रंगणार टी-20 वर्ल्ड कप थरार! पहिल्या सामन्यात कॅनडाविरुद्ध यजमान अमेरिकेने जिंकली नाणेफेक

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

T20 World Cup : अमेरिकेतील वातावरण क्रिकेटमय; बास्केटबॉल, बेसबॉलच्या देशात क्रिकेटचा बोलबाला

SCROLL FOR NEXT