Shikhar Dhawan Statement After Removed From Team India Captaincy In Zimbabwe Tour  esakal
क्रीडा

Shikhar Dhawan : कर्णधारपद गेलेला शिखर धवन म्हणाला अनुभव आहे तो...

अनिरुद्ध संकपाळ

हरारे : भारताचा संघ सध्या झिम्बावे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यासाठी ज्यावेळी पहिल्यांदा संघ घोषित झाला त्यावेळी संघाचा कर्णधार शिखर धवन होता. मात्र केएल राहुलला बीसीसीआयने झिम्बावे दौऱ्यावर जाण्यास हिरवा कंदील दाखवला आणि त्याला थेट कर्णधार केले. केएल राहुल ऐत्यावेळी संघात आला आणि थेट कर्णधार झाला. शिखर धवनचे कर्णधारपद ज्या प्रकारे गेले त्यावर अनेक जाणकारांनी नाराजी व्यक्त केली. आता यावर शिखर धवनची देखील प्रतिक्रिया आली आहे. (Shikhar Dhawan Statement After Removed From Team India Captaincy In Zimbabwe Tour)

शिखर धवन कर्णधार पद गेल्यानंतरही युवा खेळाडूंना आपल्या अनुभवाची शिदोरी वाटणार आहे. संघातील वरिष्ठ खेळाडू म्हणून आपल्या भुमिकेबद्दल बोलताना शिखर म्हणाला की, 'मला संघातील युवा खेळाडूंना एक अनुभवी खेळाडू म्हणून मात्र अनुभव शेअर करायला आवडते. मी पहिल्यांदा झिम्बावे दौऱ्यावर 2014 (2013) मध्ये आलो होतो. त्यावेळई डंकर फ्लेचर भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. जर आताच्या संघातील कोणताही युवा खेळाडू माझ्याकडे सल्ला मागण्यासाठी आला तर मी त्याला तो देण्यासाठी कायम तयार असेन.'

आशिया कपपूर्वी संघात परतलेल्या केएल राहुल बद्दल शिखर धवन म्हणाला, 'केएल राहुल संघात परतला ही एक चांगली गोष्ट आहे. तो भारतीय संघातील एक प्रमुख खेळाडू आहे. आशिया कप सुरू होण्यापूर्वी त्याची झिम्बावे दौऱ्यावर चांगली तयारी होईल. या दौऱ्याचा त्याला नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं.'

धवनने सिकंदर रझाचेही केले कौतुक

शिखर धवनने झिम्बावेचा वरिष्ठ खेळाडू सिकंदर रझाचे कौतुक केले. तो म्हणाला की सिकंदरविरूद्ध भारतीय गोलंदाजांना चतुरतेने गोलंदाजी करण्याची गरज आहे. शिखर म्हणाला की, 'सिकंदर एक चांगला खेळाडू आहे. तो बऱ्याच काळापासून झिम्बावेचे प्रतिनिधित्व करत आहे. मला विश्वास आहे की आमचे गोलंदाज त्याच्याविरूद्ध चांगली रणनिती घेऊन मैदानात उतरतील.' शिखर धवन म्हणाला की, ही मालिका शुभमन गिल, आवेश खान, इशान किशन यासारख्या खेळाडूंसाठी महत्वाची असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT