shivam dube-scored-back-to-back-half-centuries and get a chance in t20 world cup 2024 hardik pandya marathi news 
क्रीडा

Ind vs Afg : रोहित शर्माचं टेन्शन संपलं! टीम इंडियाला मिळाला पांड्यापेक्षा धाकड खेळाडू, खेळणार T20 वर्ल्ड कप?

India Vs Afghanistan T20I Series News :

Kiran Mahanavar

India Vs Afghanistan T20I Series News : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळली जाणारी तीन सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका ही टी-20 वर्ल्ड कप 2024 पूर्वीची शेवटची मालिका आहे. वर्ल्ड कपपूर्वी आयपीएलही होणार असले तरी भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळणार नाही.

दरम्यान, मालिकेतील पहिल्या दोन सामने झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माचे थोडे टेन्शन दूर झाले असावा, कारण टीम इंडियाला पांड्यापेक्षा धाकड खेळाडू मिळाला आहे, जो बॉल आणि बॅट दोन्हीमध्ये चांगली कामगिरी करत आहे.

टीम इंडियाने पहिल्या दोन टी-20 सामन्यात अफगाणिस्तानला हरवून मालिका जिंकली आहे. आता शेवटचा आणि तिसरा सामना 17 जानेवारीला बेंगळुरूमध्ये होणार आहे. दरम्यान, भारताचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेने पहिल्या दोन सामन्यांमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. सलग दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने बॅक टू बॅक अर्धशतके झळकावली आणि विकेट्सही घेतल्या.

मोहालीत खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात शिवम दुबेने 60 धावांची नाबाद खेळी केली आणि नऊ धावांत एक विकेटही घेतली. यानंतर, जेव्हा तो दुसऱ्या सामन्यात दिसला तेव्हा त्याने इंदूरमध्ये नाबाद 63 धावा केल्या. यावेळी त्याने 36 धावांत एक विकेट घेतली.

हार्दिक पांड्याची गणना टीम इंडियाच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते. टी-20 असो वा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय संघ, तो संघाचा अविभाज्य भाग आहे. नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कपमध्ये तो दुखापतग्रस्त होऊन बाहेर पडला, त्यानंतर तो आतापर्यंत पुनरागमन करू शकला नाही.

दरम्यान, टीम इंडियाच्या निवडकर्त्यांनी हार्दिक पांड्याच्या जागी आणखी काही खेळाडूला भरपूर संधी दिली, पण एकही खेळाडू आपली उपयुक्तता सिद्ध करू शकला नाही. शिवम दुबेलाही मधल्या काळात काही सामने मिळाले, पण त्यावेळी तो आपला फॉर्म दाखवू शकला नाही.

इंडियन प्रीमियर लीग2023 मध्ये शिवम दुबे एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली CSK कडून खेळताना दिसला होता. त्यावर्षी त्याने आपल्या बॅटने खूप धावा केल्या आणि संधी मिळेल तेव्हा विकेट्सही घेतल्या. याच आधारावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली. पण त्याला संधी मिळाली नाही. त्यानंतर टीम इंडिया जेव्हा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेत गेली तेव्हा पण त्याला संघात संधी देण्यात आली नाही.

यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली, तेव्हा त्यात शिवम दुबेच्या नावाचा समावेश करण्यात आला. यावेळी कर्णधार रोहित शर्मानेही त्याला संधी दिली आणि यानंतर तो वरचढ ठरला. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 17 जानेवारीला होणार आहे. यातही शिवम दुबेची भूमिका जवळपास निश्चित झाली आहे.

त्यातही शिवम दुबेने आपली कामगिरी कायम ठेवली तर 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर होईल तेव्हा निवडकर्त्यांच्या मनात त्याचे नाव नक्कीच असेल. तसे असो वा नसो, त्याचा त्या संघात समावेश व्हायला हवा. त्यामुळे रोहित शर्माचे हार्दिक पांड्यावरील अवलंबित्व कमी झाली आहे, त्याच्याकडे दुसरा पर्याय आहे, जो तो प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT