Shoaib Akhtar sakal
क्रीडा

Shoaib Akhtar : वाढदिवशी शोएब अख्तरने सांगितली वाईट बातमी, म्हणाला- 'पाच वर्षांनंतर पुन्हा...'

2011 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला अख्तर गेल्या 11 वर्षांपासून त्याच्या गुडघ्याच्या समस्येमुळे त्रस्त होता.

Kiran Mahanavar

Shoaib Akhtar Happy Birthday : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आज 13 ऑगस्टला त्याचा 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रिकेटमधील वेगवान गोलंदाजीमुळे त्याला रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखले जाऊ लागले. 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला अख्तर गेल्या 11 वर्षांपासून त्याच्या गुडघ्याच्या समस्येमुळे त्रस्त होता. अलीकडेच मेलबर्नमध्ये त्याच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

माजी वेगवान गोलंदाज अख्तरने त्याच्या 47 व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना त्याच्या शस्त्रक्रियेची माहिती दिली. अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ त्याने सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर आता बरे वाटत आहे. हळूहळू बरा होत आहे. डावा गुडघा दाखवत सांगितले की, या गुडघ्यावर मोठा कट झाला आहे. मी 8 ते 12आठवडे बरा होईल, मी आता पुन्हा चालत आहे. मी आता भेटण्याच्या स्थितीत नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि शुभेच्छा दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. मी रिकव्हरी मोडवर आहे आणि तुमच्या प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचत आहेत.

शोएब अख्तरच्या वाढदिवशी रावळपिंडी एक्सप्रेसने चाहत्यांना एक वाईट बातमी दिली की, 'पाच वर्षांनंतर मला माझा गुडघा पूर्णपणे बदलावा लागेल. बर्फ, वेदना आणि गोळ्या... गेल्या पाच-सहा दिवसांपासून माझ्या आयुष्यात हेच चालू आहे.'

पाकिस्तानच्या या महान वेगवान गोलंदाजाने आपल्या देशासाठी 224 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. शोएब अख्तरच्या नावावर 444 आंतरराष्ट्रीय विकेट आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम शोएब अख्तरच्या नावावर आहे. शोएब अख्तरने 2002 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध161.3 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करून विक्रम केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT