shoaib akhtar 
क्रीडा

शोएब अख्तरने शेअर केला इमोशनल व्हिडिओ, "तकलीफ में हूं दुआएं चाहिए..."

ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये गुडघ्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर शोएब अख्तरने एक भावूक व्हिडिओ शेअर केला आहे.

Kiran Mahanavar

Shoaib Akhtar Surgery: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर सध्या ऑस्ट्रेलियात असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये गुडघ्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर शोएब अख्तरने एक भावूक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये शोएब अख्तर भावूक दिसत आहे. चाहत्यांना त्याच्या प्रकृतीची माहिती देताना म्हणाला की, सध्या मी अडचणीत आहे आणि मला चाहत्यांच्या प्रार्थनांची गरज आहे.

शोएब अख्तरने त्याचा इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. शोएब अख्तरने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, दोन्ही गुडघ्यांवर 5-6 तासांची शस्त्रक्रिया झाली. मी संकटात आहे, फक्त तुमच्या प्रार्थनांची गरज आहे. मला आशा आहे की ही माझी शेवटची शस्त्रक्रिया असेल पण तरीही मला वेदना होत आहेत. निवृत्तीच्या 11 वर्षानंतरही मला प्रचंड वेदना होत आहेत. मी आणखी ४-५ वर्षे क्रिकेट खेळू शकलो असतो. पण, मला माहीत होतं की मी हे केलं तर मी व्हीलचेअरवर बसेन. त्यामुळेच मी क्रिकेट सोडले. पाकिस्तानकडून खेळणे ही अभिमानाची बाब आहे. वेगवान गोलंदाजांसोबत असे घडते पण पाकिस्तानसाठी काहीही फरक पडत नाही. मला पुन्हा संधी मिळाली तर मी पुन्हा तेच करेन.

शोएब अख्तरने 224 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. शोएब अख्तरच्या नावावर 444 आंतरराष्ट्रीय विकेट आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम शोएब अख्तरच्या नावावर आहे. शोएब अख्तरने 2002 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध161.3 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करून विक्रम केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Pakistan T20 World Cup : पाकिस्तानविरुद्ध सामन्यात अभिषेक शर्मा सलामीला येणार? प्रकृतीबाबत सर्वात मोठी अपडेट समोर...

Thane News: ठाणेकरांना आनंदाची बातमी! नवे ५०० खाटांचे रुग्णालय सुरू होणार, कुठे अन् सुविधा काय? जाणून घ्या

अक्षयासोबत लग्न झाल्यानंतर आयुष्यात काय बदल झाला? हार्दिक जोशीने सांगितली सगळ्या नवऱ्यांची व्यथा

राष्ट्रपती भवनातील जेवणात गुजराती चवीचा मान... साध्या बटाट्यातून राजेशाही स्वाद बनलेलं 'बटाटा नू शाक' आहे तरी काय?

Latest Marathi News Live Update : पुण्यातील मांजरीत बिबट्याची दहशत कायम

SCROLL FOR NEXT