shoaib-akhtar 
क्रीडा

न्यूझीलंडनं पाकिस्तान क्रिकेटची हत्या केली : अख्तर

पाकिस्तानमधील क्रिकेट एक्सपर्टपासून ते सामान्य क्रिकेट चाहत्यांपर्यंत सर्वच या मुद्यावर व्यक्त होताना दिसते.

सुशांत जाधव

न्यूझीलंड क्रिकेट संघाने आयत्यावेळी पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार दिला. सामना सुरु होण्यास अवघ्या काही तासांचा अवधी बाकी असताना न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सुरक्षेचं कारण देत पाकिस्तानच्या मैदानात खेळणार नसल्याचे स्पष्ट केले. या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये अक्षरश: मोठा भूकंपच झाला आहे. न्यूझीलंडच्या या निर्णयामुळे त्यांना कोट्यावधीचा तोटा होणार आहे. पाकिस्तानमधील क्रिकेट एक्सपर्टपासून ते सामान्य क्रिकेट चाहत्यांपर्यंत सर्वच यावर व्यक्त होताना दिसते.

2009 मध्ये श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दशकभराच्या अंतराने पाकिस्तानमध्ये पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटची दरवाजे उघडली गेली. क्रिकेटचे वातावरण आणखी उत्तम करण्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रयत्न सुरु असताना त्यांना न्यूझीलंडने मोठा दणका दिला. न्यूझीलंड दौरा रद्द झाल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) 150 ते 200 कोटी नुकसान सहन करावे लागू शकते.

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरनेही यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. अख्तरने सोशल मीडियाच्या माध्यमातून न्यूझीलंडवर निशाणा साधलाय. न्यूझीलंडने पाकिस्तान क्रिकेटची हत्या केली आहे. अशा शब्दांत अख्तरने न्यूझीलंडच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनेही यावर नाराजी व्यक्त केली आहे.

इंग्लंड 24 ते 48 तासांत घेणार निर्णय

न्यूझीलंडच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर इंग्लंडचा पाकिस्तान दौरा नियोजित आहे. न्यूझीलंडने खेळण्यास नकार दिल्यानंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तानात जाऊन खेळणार का? हा देखील एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सद्य परिस्थितीचा आढावा घेऊन पाकिस्तान दौऱ्यासंदर्भात निर्णय घेऊ, अशी भूमिका इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने घेतली आहे. 24 ते 48 तासांत पाकिस्तानला दुसरा दणका बसणार की दिलासा मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

PCB को हो सकता है भारी नुकसान

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) 2021 च्या सुरुवातीलाच 3 वर्षांसाठी प्रसारणाचे अधिकार 1500 कोची रुपयांना (20 कोटी डॉलर) विकले आहेत. यात PSL प्रसारणासंदर्भातील अधिकारांचाही समावेश आहे. न्यूझीलंड दौरा रद्द झाल्यामुळे त्यांना 150 ते 200 कोटीचा फटका बसू शकतो. इंग्लंडने दणका दिला तर यात आणखी भर होण्याची भिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डासमोर निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT