Shoaib Akhtar 
क्रीडा

'रावळपिंडी एक्सप्रेस' Shoaib Akhtar वर येतोय चित्रपट पाहा कधी होणार रिलीज

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरवर बायोपिक येणार आहे.

Kiran Mahanavar

Shoaib Akhtar : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरवर बायोपिक येणार आहे. शोएब अख्तरच्या चित्रपटाचे नाव 'रावळपिंडी एक्सप्रेस-रनिंग अगेन्स्ट द ऑड्स' असे आहे. शोएबने स्वत: त्याच्या यूट्यूब चॅनलवर चित्रपटाशी संबंधित एक पोस्टर रिलीज करून हे माहिती दिली. चित्रपटाची रिलीज डेटही चाहत्यांसाठी समोर आली आहे. हा चित्रपट येत्या 16 नोव्हेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे.

चित्रपटाच्या रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये एक माणूस रेल्वे ट्रॅकवर धावताना दिसत आहे. शोएबचा जन्म रावळपिंडीत झाला त्यानंतर तो वेगवान गोलंदाज कसा झाला, या 'रावळपिंडी एक्सप्रेस' मधून दर्शवण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा बायोपिकही याच नावाने येत आहे. शोएब अख्तरच्या बायोपिकचे दिग्दर्शन मोहम्मद फजर कासीर करत आहेत. शोएबने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून बायोपिकचे पोस्टर रिलीज केले आहे. त्याने कॅप्शन लिहिले की, ही सुंदर प्रवासाची सुरुवात, माझी कथा, माझे आयुष्य, माझा बायोपिक ‘रावळपिंडी एक्सप्रेस-रनिंग अगेन्स्ट द ऑड्स’ पाकिस्तानी खेळाडूवरचा पहिला विदेशी चित्रपट तुमचा स्वतःचा शोएब अख्तर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT