क्रीडा

"ओव्हरस्मार्ट बनू नकोस, उठ अन् चालता हो"; अख्तरवर अँकर भडकला

शोएब कार्यक्रमाच्या मध्येच उठून निघून गेला... (Live TV Controversy)

विराज भागवत

शोएब अख्तरचा लाइव्ह शो मध्ये अँकरने केला अपमान (Live TV Controversy)

कराची: बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या संघाने भारताला पराभूत केले. पाकिस्तानसाठी हा एक ऐतिहासिक विजय होता. या विजयानंतर पाकिस्तानच्या एका वाहिनीवर पाकिस्तानच्या कामगिरीबद्दल चर्चा करण्यासाठी एक शो घेण्यात आला. त्या चर्चेसाठी पाकचा माजी गोलंदाज शोएब अख्तर, विंडिजचे सर व्हिव्हियन रिचर्ड्स, डेव्हिड गोव्हर यासारखे महान क्रिकेटपटू होते. या शो दरम्यान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे अँकर डॉ. नौमान नियाझ यांनी शोएब अख्तरचा अपमान करत त्याला थेट शो मधून निघून जाण्यास सांगितल्याची घटना घडली.

शो सुरू असताना शाहीन आफ्रिदी आणि हॅरीस सोहेल या दोघांच्या क्रिकेटमधील उदयाची चर्चा सुरू होती. ते सुरू असताना शोएब अख्तर याने हे लोक पाकिस्तान क्रिकेट लीग मधील लाहोर कलंदर्स संघामुळे पाक क्रिकेटला मिळाल्याचे सांगितलं. त्यावरून नौमान नियाझ आणि शोएब अख्तर या दोघांमध्ये थोडीशी बाचाबाची होण्यास सुरूवात झाली होती. त्यावेळी कार्यक्रमाचे अँकर नौमान यांनी थेट शोएबला शो मधून उठून निघून जाण्यास सांगितलं.

पाहा नक्की कसा घडला वाद? (Video)

शोएब कार्यक्रमाच्या मध्येच उठून निघून गेला...

या प्रकारानंतर शोएब अख्तर शो सोडून निघून गेला. पण त्याने आपली बाजू ट्वीटरवर मांडली. सध्या माझ्याबद्दलच्या काही व्हिडीओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे मला त्याबद्दल स्पष्टीकरण द्यावंसं वाटलं. डॉ. नौमान यांनी माझं बोलणं मध्येच थांबवलं आणि अतिशय उद्धटपणे मला शो मधून बाहेर व्हायला सांगितलं. व्हिव रिचर्ड्स आणि डेव्हिड गोव्हर अशा महान क्रिकेटपटूंसमोर अशा पद्धतीने मला मिळालेली वागणूक अपमानास्पद होती. इतक्या मोठ्या लोकांसमोर कोणालाही ओशाळल्यासारखं होऊ नये यासाठी मी तेथील माहोल थोडासा हलका करण्याचा प्रयत्न केला. मला वाटलं मी तसं केल्यास ते माझी माफी मागतील आणि शो पुढे घेऊन जातील. पण त्यांनी माफी मागितलीच नाही. त्यामुळे नाईलजाने मला शो मधून निघून जावं लागलं, असं स्पष्टीकरण अख्तरने दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati on Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी मायावतींनी घेतला मोठा निर्णय ; ट्वीटद्वारे 'बसपा'ची भूमिका जाहीर!

Pune News : महापालिका निवडणुकीसाठी ५ हजार मतदान केंद्र

Pune Water Close : पुणे शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

Latest Marathi News Live Update : मंचर येथून परांडा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी किराणा साहित्याचे दोन ट्रक रवाना

SCROLL FOR NEXT