Shoaib Malik Rumored Flirting With Nawal Saeed  esakal
क्रीडा

Shoaib Malik : जित्याची खोड... सना जावेद झाली आता शोएब मलिकचं अजून एका अभिनेत्री सोबत फ्लर्टिंग?

अनिरुद्ध संकपाळ

Shoaib Malik Affaires : पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने जानेवारी 2024 मध्ये इन्स्टाग्राम पोस्ट करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्याने भारताची सुपर स्टार टेनिसपटू सानिया मिर्झासोबतचा संसार मोडत सना जावेदसोबत नवा संसार थाटला होता. इन्स्टाग्राम पोस्टद्वारे त्याने आपले हे नाते सार्वजनिक केले होते. सना ही शोएबची तिसरी पत्नी झाली. मात्र आता अजून एका अभिनेत्रीसोबत शोएब मलिक फ्लर्टिंग करत असल्याचे वृत्त येत आहे.

सना जावेदशी शोएब मलिक हा एका पाकिस्तानी शो दरम्यान भेटला होता. त्यानंतर या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. शोएब अन् सानिया यांचा संसार सुरू असतानाच शोएब फक्त सना जावेदसोबत फ्लर्टिंग करत नव्हता तर अनेक मुलींसोबत तो फ्लर्टिंग करत असल्याचे पुढे आले आहे.

कोण आहे नवाल सईद?

पाकिस्तानची एक 25 वर्षाची अभिनेत्री सध्या खूप चर्चेत आली आहे. ती एका रमजान शो मध्ये पाहुणी म्हणून आली होती. हा तोच शो होता जेथे सना जावेद आणि शोएब मलिक यांची पहिल्यांदा भेट झाली होती.

या कार्यक्रमादरम्यान नवाल सईदला विचारण्यात आलं की तुला कोणत्या अभिनेत्याने मेसेज केला होता का? यावर तिनं सांगितलं की मला जास्तीजास्त मेसेज हे क्रिकेटपटूंचे येतात. तिने सांगितले की तिला इन्स्टाग्रामवर थेट मेसेज केले जातात.

ते देशाचे प्रतिनिधित्व करत असतात. असा प्राकर करणं योग्य नाही असं नवाल म्हणते. त्यानंतर शोच्या होस्टने तिला थेट प्रश्न केला की तुला शोएब मलिक मेसेज करतो का? त्यावर अभिनेत्रीने हसून उत्तर देणं टाळलं. मात्र तिने सांगितलं की क्रिकेटपटूंनी केलेल्या मेसेजचे ती स्क्रीनशॉट ठेवते. या उत्तरामुळे सर्वांच्याच मनात शंकेची पाल चुकचुकली.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT