Sania Mirza-Shoaib Malik Esakal
क्रीडा

Sania Mirza-Shoaib Malik : पराभवानंतर सानिया रडली अन् पती शोएब मलिकची ती पोस्ट चर्चेत आली

सानिया मिर्झाला तिच्या शेवटच्या ग्रँडस्लॅममध्ये पराभवाचा सामना करावा लागला

सकाळ डिजिटल टीम

सानिया मिर्झाला तिच्या शेवटच्या ग्रँडस्लॅममध्ये पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाने सानियाचे विजयी निरोपाचे स्वप्न भंगले. मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत सानिया आणि रोहन बोपण्णा यांचा 6-7, 6-2 असा पराभव झाला. पराभूत झाल्यानंतर भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाला अश्रू अनावर झाले. सानिया आणि बोपण्णा जोडीला जेतेपदाच्या लढतीत ब्राझीलच्या स्टेफनी आणि माटोस यांनी पराभूत केले.

या स्पर्धेच्या आधिच सानिया मिर्झाने हा सामना आपला शेवटचा ग्रँडस्लॅम असल्याचे जाहीर केले होते. फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर सानियाचा पती शोएब मलिकने एक भावनिक पोस्ट ट्विटरवर शेअर केली आहे. ज्यामध्ये शोएबने लिहिले आहे की, 'तु क्रीडा क्षेत्रातील सर्व महिलांसाठी आशा आहे. तुझ्या कारकिर्दीत तु जे काही मिळवले आहे त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. तु अनेकांसाठी प्रेरणा आहेस. अशीच खंबीर राहा. तुझ्या अतुलनीय कारकिर्दीसाठी खूप खूप अभिनंदन' अशा स्वरूपाची पोस्ट त्याने लिहली आहे.

आतापर्यंत सानिया मिर्झा ग्रँड स्लॅम डबल्समध्ये सहा वेळा चॅम्पियन ठरली. त्यामुळेच या स्पर्धेतील पराभवाने तिच्यासह तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सानियाने तीन मिश्र दुहेरी आणि तीन महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले. ग्रँड स्लॅम 2016 मध्ये सानियाने ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. पण सातवे ग्रँडस्लॅम जिंकण्याचे सानियाचे स्वप्न भंगले आहे.

सामना संपल्यानंतर रोहन बोपण्णाने सानिया मिर्झाचे कौतुक केले. सानियाने तिच्या खेळाने अनेक तरुणांना प्रेरित केले हे त्याने सांगितले. यादरम्यान जेव्हा कॅमेरा सानियाकडे सरकतो तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. यानंतर सानिया स्वतः माईक बोलत असताणा तिला काही बोलता आले नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT