Shoaib Malik  saka
क्रीडा

Shoaib Malik : घटस्फोटांच्या चर्चांना ऊत आला असताना मलिक लाईव्ह शो मध्ये ढसाढसा रडला - VIDEO

शोएब मलिक लाइव्ह टीव्हीवर रडला, हा सीन याआधी पाहिला नसेल

Kiran Mahanavar

पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज शोएब मलिक सध्या सानिया मिर्झासोबतच्या नात्यामुळे चर्चेत आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार तो आणि सानिया वेगळे होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, शोएबचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो लाइव्ह टीव्हीवरच रडायला लागतो.

हेही वाचा: गौतमी नाचली, तुमचं काय गेलं?

हा व्हिडिओ पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्याच्या एक दिवस आधीचा आहे. ज्यामध्ये वकार युनूस, वसीम अक्रम, मिसबाह-उल-हक आणि शोएब मलिक एका पाकिस्तानी चॅनलवरील पॅनेल चर्चेत उपस्थित होते. अँकरने शोएब मलिकला विचारले की, 2007 च्या टी-20 विश्वचषकाच्या फायनलमधील पराभव आणि 2009 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकल्यावर तुला काय वाटतंय, पण या प्रश्नाचे उत्तर देताना शोएब भावूक झाला आणि रडला लागला.

या व्हायरल व्हिडीओमध्ये अँकर शोएबला विचारतो की, आधी 2007 च्या फायनलमधील पराभव त्यानंतर 2009 मध्ये जिंकला याबद्दल तुला काय वाटतंय. या प्रश्नावर मलिक म्हणतो की, जेव्हा आम्ही 2009 मध्ये फायनल जिंकलो तेव्हा युनूस भाईने मला कॉल केला आणि ट्रॉफी धरा असे सांगितले. हे सांगितल्यानंतर शोएब खूप भावूक झाला आणि लाइव्ह टीव्हीवरच रडला लागाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून चाहते हा व्हिडिओ खूप शेअर करत आहेत.

त्याचवेळी शोएब मलिकच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले, तर सध्या काहीही बरोबर होताना दिसत नाही. सानिया मिर्झासह त्याच्या घटस्फोटाच्या बातमीने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. अद्याप या प्रकरणावर दोघांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : जानेवारीच्या पगारात 8व्या वेतन आयोगाची वाढ मिळेल का? किती वाढणार पगार? जाणून घ्या पगारवाढीबाबत मोठा अपडेट

हो की नाही एवढंच बोला! मला बोलायचंय म्हणणाऱ्या वाल्मिक कराडला कोर्टानं फटकारलं; सुनावणीत काय घडलं?

Navneet Rana : मौलानाला चार बायका १९ मुलं, आता हिंदूंनीही ४ मुलं जन्माला घाला; भाजप नेत्या नवनीत राणांचं खळबळजनक विधान

रुग्णाला घेऊन जाणारं अमेरिकन नौदलाचं विमान कोसळलं; ५ जणांचा मृत्यू, तिघे बेपत्ता

Supreme Court : पत्नीला खर्चाचा हिशोब ठेवण्यास सांगणे क्रूरता नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल

SCROLL FOR NEXT