Shreyas Iyer esakal
क्रीडा

Shreyas Iyer : विराट खेळीच्या दणदणाटात श्रेयस अय्यरच्या विक्रमाकडे दुर्लक्ष नको

अनिरुद्ध संकपाळ

Shreyas Iyer : भारताने वनडे वर्ल्डकप 2023 च्या सेमी फायनल सामन्यात न्यूझीलंडविरूद्ध 397 धावांचा डोंगर उभारला. भारताकडून विराट कोहलीने 113 धावांची दमदार शतकी खेळी केली. त्याला श्रेयस अय्यरने देखील 70 चेंडूत 105 धावांची शतकी खेळी करत उत्तम आणि आक्रमक साथ दिली.

मात्र विराट कोहलीचे हे 50 वे वनडे शतक असल्याने त्याची चर्चा सर्वत्र सुरू होती. त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 49 वनडे शतकांचा विश्वविक्रम मोडला. त्यामुळे त्याच्या शतकीचा चर्चा होणे स्वाभाविक आहे. मात्र श्रेयस अय्यरने देखील दमदार खेळी केली होती. त्याचबरोबर अय्यरने एक मोठा विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे. अशा विक्रम यापूर्वी वर्ल्डकप इतिहासात कधी झाला नव्हता.

श्रेयस अय्यर हा वर्ल्डकपच्या एका एडिशनमध्ये 500 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने चौथ्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना या 500 धावा केल्या आहेत. यापूर्वी 2007 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडच्या स्कॉट स्टायरिसने 499 धावा केल्या होत्या. तर 2015 च्या वर्ल्डकपमध्ये एबी डिव्हिलियर्सने 482 धावा केल्या होत्या. गेल्या 2019 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये हिरो ठरलेल्या बेन स्टोक्सने 465 धावा केल्या होत्या.

श्रेयस अय्यरने विराट कोहलीसोबत 163 धावांची भागीदारी रचली. ही वर्ल्डकपमध्ये बाद फेरीत भारताकडूनची सर्वात मोठी भागीदारी ठरली. यापूर्वी 2015 च्या वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांनी बांगलादेशविरूद्ध उपांत्य फेरीत 122 धावांची भागीदारी रचली होती. 2019 च्या वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीत न्यूझीलंड धोनी आणि जडेजाने 116 धावांची भागीदारी रचली होती.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaiwal: "तानाजी सावंतला मध्ये का घेतोस? मी घरी येतो नाहीतर.." गुंड निलेश घायवळचा धमकीवजा फोन कॉल

Dextromethorphan Cough Syrup: राजस्थानमध्ये हे कफ सिरप ठरतंय धोकादायक! डेक्सट्रोमेथॉर्फनबद्दल जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Drishyam 3 : आता येतोय दृश्यम 3 ! अजय देवगण 'या' तारखेला करणार सिनेमाची घोषणा

Nagpur Crime: नागपूर हादरलं! गरोदर महिलेचा खून करुन रस्त्याच्या कडेला फेकलं; 'अशी' उघडकीस आली घटना

Viral: मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात कार्यकर्त्याचे लाजिरवाणे कृत्य, रुग्णाला बिस्कीट दिले, फोटो काढला अन् परत घेतले, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT