Shreyas Iyer Bails VIDEO esakal
क्रीडा

Shreyas Iyer VIDEO : नशीब असावं तर अय्यर सारखं! पंचांनी बदललेल्या बेल्सने इबादतला दिला दगा

अनिरुद्ध संकपाळ

Shreyas Iyer Bails VIDEO : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी श्रेयस अय्यरने नाबाद 82 धावा केल्या. मात्र त्याच्या या खेळीत त्याला दोनदा जीवनदान मिळाले. 75 व्या षटकात इबादतने मेहदी हसनच्या गोलंदाजीवर त्याचा सोपा झेल सोडला होता. तर इबादतच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरचा त्रिफळा उडाला होता. मात्र पंचांनी त्याला बाद ठरवले नाही. या घटनेवेळी इबादतसह संपूर्ण बांगलादेशचा संघ श्रेयस अय्यरला लाभलेल्या नशीबावर अवाक झाला होता. दुसरीकडे श्रेयस अय्यर आणि चेतेश्वर पुजारा हसत होते.

इबादतने टाकलेला 83 व्या षटकातील पाचवा चेंडू पडून जोरात आत आला. श्रेयसला काही समजायच्या आतच चेंडू स्टम्पला चाटून गेला. बेल्सची लाईट देखील लागली. मात्र बेल्स काही खाली पडली नाही. इबादतसह बांगलादेशच्या संघाला वाटले की आता श्रेयस अय्यर बाद झाला. मात्र बेल्स जागेवरून हलली नाही त्यामुळे पंचांनी श्रेयसला बाद ठरवले नाही. विशेष म्हणजे याच षटकात पंचांनी हीच बेल्स बदलली होती.

अय्यरचे आज नशीबच चांगले होते. त्यानंतर अय्यर शेवटच्या षटकापार्यंत टिकून राहिला आणि दिवसअखेर धावा केल्या. आता या दोन जीवनदांनांचा फायदा उचलत श्रेयस अय्यर आपले शतक साजरे करतो का हे पहावे लागले.

दरम्यान, भारताने बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी 6 बाद 278 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून चेतेश्वर पुजाराने 203 चेंडूत 90 धावा ठोकल्या. तर श्रेयस अय्यर दिवसअखेर 82 धावा करून नाबाद राहिला. ऋषभ पंतनेही 45 चेंडूत 46 धावा ठोकत आपले योगदान दिले. बांगलादेशकडून डावखुरा फुरकी गोलंदाज तैजुल इस्लामने 3 तर मेहदी हसन मिर्झाने 2 विकेट घेत भारताच्या टॉप ऑर्डरला खिंडार पाडले. दिवसाच्या अखेरच्या चेंडूवर अक्षर पटेल 14 धावांवर बाद झाला.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT