पोर्ट ऑफ स्पेन : संघ प्रतिकूल परिस्थितीत असतो. ड्रेसिंग रूम नर्व्हस असते, त्या वेळी फलंदाजी करायला मला खूप आवडते, असे श्रेयस अय्यरने सांगितले. तसेच तुझी खेळी एका शब्दांत सांग असे युझवेंद्र चहलने सांगितल्यावर त्याने केवळ शानदार! असे म्हणत स्वत:च्या खेळीचे कौतुक केले. वेस्ट इंडीजविरुद्धच्या सलग दुसऱ्या एकदिवसीय लढतीत श्रेयसने निर्णायक कामगिरी केली.
विराट कोहलीस श्रेयसची पुन्हा साथ लाभली. या दोघांनी प्रतिकूल परिस्थितीत दुसऱ्या सामन्यात 125; तर तिसऱ्या सामन्यात 120 धावांची भागीदारी केली. तिसऱ्या सामन्यात श्रेयस फलंदाजीस आला, त्या वेळी भारताची अवस्था 3 बाद 91 होती. पण त्याने 41 चेंडूत 65 धावांचा तडाखा देत कोहलीवरील दडपण कमी केले.
संघ प्रतिकूल परिस्थितीत असतो, ड्रेसिंग रूममध्ये प्रत्येक जण नर्व्हस असतो, त्या वेळी फलंदाजी करायला मला आवडते. त्या वेळी काहीही घडण्याची शक्यता असते. या दडपणाखाली खेळण्याचा आनंद वेगळाच असतो, असे श्रेयसने सांगितले. त्याने आपल्या खेळीत एकंदर पाच षटकार मारले.
विंडीज फलंदाजांनी चाहलला लक्ष्य केले होते. त्याचा बदला आपण घेतला, असे श्रेयसने चाहलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. आमच्या गोलंदाजांवर केलेल्या हल्ल्याचा मला बदला घ्यायचा होता. पूरण चांगला फलंदाज आहे; पण चाहलला लक्ष्य केल्यामुळे मी चिडलो होतो. त्यामुळेच मी त्यांच्या गोलंदाजांवर प्रतिहल्ला केला, असे अय्यरने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.