icc player of month awards  Sakal
क्रीडा

ICC Player Of Month Awards : श्रेयस मिताली अन् दीप्ती शर्यतीत

सकाळ डिजिटल टीम

भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) स्टार खेळाडू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), महिला संघाची कर्णधार मिताली राज (Mithali Raj) आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा (Deepti Sharma) हे तीन खेळाडू आयसीसीच्या मंथ ऑफ अवार्डच्या शर्यतीत आहेत. फेब्रुवारी महिन्यातील पुरस्कारासाठी या तिघांच्या नावाची शिफारस करण्यात आलीये. पुरुष गटातून संयुक्त अरब अमीरातचा फलंदाज वृत्य अरविंद आणि नेपाळचा दीपेंद्र सिंह एरी यांच्या नावाचाही यात समावेश आहे. महिला गटात न्यूजीलंड अष्टपैलू एमेलिया केर, मिताली राज आणि दीप्ती शर्मा यांच्या नावाचा समावेश आहे.

श्रेयस अय्यरने फेब्रुवारीमध्ये दमदार कामगिरीची नोंद केली होती. वेस्ट इंडीज विरुद्धच्या अखेच्या वनडेत त्याने 80 धावांची खेळी केली होती. याशिवाय टी20 मध्ये त्याने 16 चेंडूत 25 धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झाल्यानंतर आणि प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिल्यानंतर अय्यरला श्रीलंका विरुद्धच्या टी-20 मालिकेत संधी मिळाली. याचे त्याने सोने करुन दाखवले. तीन सामन्यांच्या मालिकेतील प्रत्येक सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले होते. या मालिकेत त्याने 174.35 च्या स्ट्राइक रेटनं 204 धावा कुटल्या होत्या.

वनडे मालिकेत मितालीची तीन अर्धशतके

मिताली राजने न्यूझीलंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत तीन अर्धशतके झळकावली आहेत. या मालिकेत तिने 232 धावा करुन लक्षवेधी खेळ केला होता. चार सामने गमावल्यानंतर अखेरच्या सामन्यात मितालीच्या खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाला विजय मिळाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chakan News : अखेर दिवाळीचा मुहूर्त मिळणार! तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या कामाच्या निविदा ऑक्टोंबर मध्ये खुल्या होणार

सणांचा आनंद दुप्पट होणार; एका पेक्षा एक चित्रपट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार, तुम्ही कोणता पाहणार

Mohol News : चिंचोली-काटी औद्योगिक वसाहतीतील केमिकल कंपनीला भीषण आग; आगीत कंपनी पूर्ण जळून खाक

Manchar News : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिलीप वळसे पाटील यांचे आवाहन; अवघ्या अर्ध्या तासात ८४ लाख रुपये झाले जमा

Georai Crime : धक्कादायक! चार महिन्याच्या चिमुकल्याची हत्या करून वडिलांनी गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT