Shreyas Iyer  esakal
क्रीडा

Shreyas Iyer : श्रेयस अय्यरचा संघात समावेश! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत उमटवता आला नाही ठसा

Shreyas Iyer News |

Kiran Mahanavar

Ranji Trophy 2023-24 Shreyas Iyer : श्रेयस अय्यर याची मुंबईच्या क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. मुंबई - आंध्र यांच्यामध्ये १२ ते १५ जानेवारी यादरम्यान वांद्रे-कुर्ला संकुलातील शरद पवार क्रिकेट अकादमीत रणजी क्रिकेट करंडकाचा एलिट अ गटातील सामना होणार आहे. या लढतीसाठी मुंबई संघाची निवड करण्यात आली आहे.

श्रेयस अय्यर अखेरचा रणजी सामना २०१८ मध्ये खेळला होता. अय्यरला नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत ठसा उमटवता आला नाही. त्याच्या बॅटमधून ४१ धावाच निघाल्या. आता इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेआधी सराव करता यावा यासाठी अय्यरला मुंबई संघात निवडण्यात आले आहे. या लढतीत तो कसोटी मालिकेचा सराव करू शकणार आहे.

दरम्यान, मुंबईच्या संघाने यंदाच्या रणजी मोसमातील पहिल्याच लढतीत बिहारवर दणदणीत विजय मिळवला.

आंध्रविरुद्धच्या लढतीसाठी मुंबईचा संघ ः अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, जय बिस्ता, भूपेन लालवानी, अमोघ भाटकळ, सुवेद पारकर, प्रसाद पवार (यष्टिरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टिरक्षक), शम्स मुलानी, तनुष कोटियन, अथर्व अंकोलेकर, मोहित अवस्थी, धवल कुलकर्णी, रॉयस्टन डियास, सिल्वेस्टर डिसोझा.

पाच कसोटी सामन्यांची मालिका

भारत-इंग्लंड यांच्यामध्ये २५ जानेवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन देशांमधील कसोटी सामने हैदराबाद, विशाखापट्टनम, राजकोट, रांची, धर्मशाळा येथे पार पडणार आहेत. या कसोटी मालिकेसाठी श्रेयस अय्यर सज्ज होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : मोठी बातमी! तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

SCROLL FOR NEXT