Shreyas Iyer esakal
क्रीडा

Shreyas Iyer : अय्यरला विश्रांती नाही तर मिळाली शिक्षा; काय म्हणाला राहुल द्रविड?

अनिरुद्ध संकपाळ

Shreyas Iyer : भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरची अफगाणिस्तानविरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघात निवड झालेली नाही. सुरूवातीला बीसीसीआयने त्याला विश्रांती दिल्याचे सांगण्यात आलं होतं. मात्र इंग्रजी माध्यामांनी दिलेल्या वृत्तानुसार अय्यरवर शिस्तभंगाची कारवाई झाली त्यामुळे त्याचा अफगाणिस्तान मालिकेतून पत्ता कट झाला.

दरम्यान, अफगाणिस्तानविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितले की अय्यरवर शिस्तभंगाची कारवाई झाली नसून संघात खूप फलंदाज होत होते म्हणून त्याला संघात घेण्यात आलं नाही.

दुसरीकडे माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत खराब कामगिरीनंतर निवडसमितीने श्रेयस अय्यरला रणजी ट्रॉफी सामने खेळण्यास सांगितले होते. मात्र त्याने सुट्टी घेणे पसंत केले. निवडसमितीला हे आवडले नाही. त्यांनी अय्यरवर शिस्तभंगाची कारवाई करत त्याला अफगाणिस्तानविरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी निवडलेल्या संघातून डच्चू दिला.

यानंतर श्रेयस अय्यरने रणजी ट्रॉफी सामना खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा समावेश मुंबईच्या रणजी संघात करण्यात आला असून मुंबईचा संघ 12 ते 15 जानेवारीदरम्यान आंध्र प्रदेशविरूद्ध रणजी सामना खेळणार आहे. त्या संघात अय्यरचा समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडविरूद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी अय्यरसाठी ही सरावाची उत्तम संधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT