Shreyas-Iyer 
क्रीडा

IND vs NZ: झकास बॅटिंग करूनही श्रेयसला लागत नव्हती झोप, कारण...

श्रेयस अय्यरने सांगितला रंजक किस्सा |IND vs NZ 1st Test

विराज भागवत

श्रेयस अय्यरने सांगितला रंजक किस्सा

IND vs NZ 1st Test Day 2 Live Updates : भारतीय संघाने दमदार फलंदाजी केल्यानंतर न्यूझीलंडच्या संघानेही यजमानांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. टीम इंडियाने श्रेयस अय्यरच्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात ३४५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १२९ धावांची भक्कम सलामी दिली. विल यंगने नाबाद ७५ तर टॉम लॅथमने नाबाद ५० धावा करत पाहुण्या संघाला चांगल्या स्थितीत नेले. दिवसाचा खेळ संपल्यानंतर श्रेयस अय्यरने आपल्या भावना व्यक्त केल्या.

"पहिल्या दिवसाच्या डावात जो काही खेळ झाला त्यावर मी खूपच खुश होतो. रात्री मला छान झोप लागेल अशी माझी अपेक्षा होती, पण उलटं घडलं. मला टेन्शनमुळे नीट झोप लागूच शकली नाही. सुनील गावसकर यांनी मला कसोटी कॅप देताना म्हंटलं होतं की फार पुढचा विचार करू नको आणि भूतकाळात काय घडलं यातही अडकून राहू नकोस. वर्तमानात काय घडतंय ते पाहा आणि त्यानुसार निर्णय घे. तोच विचार केला आणि कशीबशी झोप लागली. झोप अर्धवट झाली होती, पण दुसऱ्या दिवशी मैदानात उतरून शतक ठोकलं तेव्हा सगळा ताण निघून गेला", अशी प्रतिक्रिया श्रेयस अय्यरने दिली.

दरम्यान, भारताने पहिल्या डावात ३४५ धावा केल्या. मयंक अग्रवाल (१३), चेतेश्वर पुजारा (२६), अजिंक्य रहाणे (३५), वृद्धिमान साहा (१), रविचंद्रन अश्विन (३८), अक्षर पटेल (३) यांना फलंदाजीत फारशी चमक दाखवता आली नाही. पण, श्रेयस अय्यरने दमदार शतक (१०५) लगावले. त्याला शुबमन गिल (५२) आणि रविंद्र जाडेजा (५०) यांनी चांगली साथ दिली. त्यामुळे भारताला ३४५ धावांपर्यंत मजल मारता आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra TET Paper Leak : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा(TET) पेपरफुटीचे बिहार कनेक्शन; मास्टरमाईंडच्या पत्नीला पाटण्यातून अटक

Lonavala Heavy Rain : चोवीस तासांत १३१ मिमी पाऊस; लोणावळ्यात जोरदार पावसाने सखल भाग जलमय

FIFA World Cup 2026 : पैशाने नाही विकत घेता येत गुणवत्ता; वर्ल्डकप फुटबॉलमधील सौदी, कतारच्या अपयशानंतर अधोरेखित

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; सायन-पनवेल महामार्ग जलमय, वाहतूक व लोकल सेवा विस्कळीत

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दुपारी ४ वाजता सर्व केंद्रीय मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक

SCROLL FOR NEXT