Shreyas Iyer IND vs NZ  ESAKAL
क्रीडा

Shreyas Iyer : भन्नाट कॅच घेणाऱ्या श्रेयस अय्यरनं ड्रेसिंग रूमकडे पाहून कोणता इशारा केला?

अनिरुद्ध संकपाळ

Shreyas Iyer IND vs NZ : वर्ल्डकप 2023 मधील भारत आणि न्यूजीलंड यांच्यातील सामन्यात भारताचे क्षेत्ररक्षण लौकिकास साजेसे झाले नाही. रविंद्र जडेजाने 75 धावा करणाऱ्या रचिन रविंद्रचा सोपा झेल सोडला होता. त्यानंतर बुमराहने देखील मिचेलचा झेल सोडला अन् त्यानं शतक ठोकले.

जरी जडेजा आणि बुमराहने दोन महत्वाच्या खेळाडूंचा झेल सोडला असला तरी सामन्याच्या सुरूवातीला श्रेयस अय्यरने शतकांचा रतीब घालणाऱ्या डेवॉन कॉनवेचा एक अप्रतीम झेल टिपला होता. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर कॉनवेने स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळला होता. मात्र हवेत असलेला चेंडू अय्यरने डाईव्ह मारून पकडला. फिल्डिंगच्या बाबतीत ही आजच्या दिवसातील दिलासादायक कामगिरी होती.

दरम्यान, कॉनवेचा झेल पकडल्यानंतर श्रेयस अय्यरने ड्रसिंग रूमकडे पाहून एक इशारा केला होता. अय्यरने ड्रेसिंग रूमकडे पाहून फिल्डिंग कोच टी दिलीप यांना एक इशारा केला. त्याने आजच्या सामन्यातील फिल्डर ऑफ द मॅचचे मेडल हे मलाच मिळणार असा तो इशारा होता.

सिराजने किवींना पहिला धक्का दिला. त्यानंतर यंदाच्या वर्ल्डकपमधील आपला पहिला सामना खेळणाऱ्या मोहम्मद शामीने पहिल्याच चेंडूवर विल यंगचा त्रिफळा उडवत भारताला दुसरे यश मिळवून दिले.

यानंतर मात्र किवींनी जोरदार पुनरागमन केले. रविंद्र जडेजाकडून जीवनदान मिळालेल्या रचिन रविंद्रने डॅरेल मिचेलसोबत तिसऱ्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी रचली. मिचेलला देखली बुमराहने जीवनदान दिले होते. मात्र या भागीदारीनंतर भारतीय संघानेही जोरदार पुनरागमन केलं.

शामीने रचिनला 75 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर कुलदीप यादवने टॉम लॅथम आणि ग्लेन फिलिप्सला बाद करत दोन बळी टिपले. बुमराहने कॅम्पनची 6 धावांवर शिकार केली. पाठोपाठ शमीने मिचेल सँटनरचा त्रिफळा उडवत किवींना 300 धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT