shubman gill 2nd icc odi batting rankings rohit sharma virat kohli gill top 10 sakal
क्रीडा

ODI Batting Rankings : फलंदाजीच्या एकदिवसीय क्रमवारीत गिल, विराट अन् रोहित दहामध्ये

२०१८ नंतर फलंदाजीच्या क्रमवारीत पहिल्या दहांमध्ये तीन भारतीय असण्याची ही पहिली वेळ आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा तोंडावर आलेली असताना भारतीय संघाने आशिया करंडक स्पर्धेची अंतिम फेरी तर गाठलीच; त्याचबरोबर फलंदाजीच्या एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या दहा खेळाडूंमध्ये शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहित शर्मा या तीन भारतीयांनी स्थान मिळवले.

सलामीवीर गिलने प्रथमच दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. या आशिया करंडक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहितसह १२१ धावांची सलामी देताना वैयक्तिक ५८ धावांची खेळी करणारा गिल श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात १९ धावाच करू शकला असला, तरी तो दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात नाबाद शतक करणारा विराट कोहली आणि याच लढतीत ५३, श्रीलंकेविरुद्ध ५६; तसेच ४ सप्टेंबर रोजी नेपाळविरुद्धच्या सामन्यात नाबाद ७४ धावा करणाऱ्या रोहितने नववे स्थान मिळवले तर विराट कोहली आठव्या क्रमांकावर पोहचला आहे.

२०१८ नंतर फलंदाजीच्या क्रमवारीत पहिल्या दहांमध्ये तीन भारतीय असण्याची ही पहिली वेळ आहे. चार वर्षांपूर्वी रोहित, विराट आणि शिखर धवन पहिल्या सहा फलंदाजांमध्ये स्थान मिळवून होते.

पहिल्या दहा फलंदाजांमध्ये पाकचेही तीन फलंदाज आहेत. अव्वल स्थानावर बाबर आझम कायम असून इमाम उल हक आणि फखर झमान अनुक्रमे पाचव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहेत.

इतर खेळाडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बाऊमाने २१ क्रमांकाने झेप घेत तो ११ व्या स्थानावर पोहचला आहे. गेल्या आठ एकदिवसीय सामन्यात त्याने तीन शतके आणि दोन अर्धशतके फटकावलेली आहेत. या अगोदर २५ ही त्याची सर्वोत्तम क्रमवारी होती.

जवळपास सहा ते सात महिन्यानंतर पुनरागमन करणाऱ्या केएल राहुलने पाकविरुद्ध केलेल्या शतकामुळे दहा क्रमांकाने प्रगती करत ३७ वे स्थान मिळवले आहे, तर इशान किशन २२ व्या स्थानावर आला आहे.

गोलंदाजीच्या क्रमवारीत ट्रेंट बोल्ट आणि जॉश हॅझलवूड संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आले आहेत. या आशिया करंडक स्पर्धेत दोन सामन्यांत मिळून नऊ विकेट मिळवणारा कुलदीप यादव सातव्या स्थानावर पोहचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT