Shubman Gill IND vs ENG esakal
क्रीडा

Shubman Gill IND vs ENG : शुभमन गिलने सचिन तेंडुलकरच्या पंक्तीत जात तब्बल सात वर्षाचा दुष्काळ संपवला

Shubman Gill Century : शुभमन गिलने तिसऱ्या क्रमांकावर खेळताना ठोकलं पहिलंच शतक

अनिरुद्ध संकपाळ

Shubman Gill First Century As Number 3 Batsmen : भारतीय क्रिकेटमधील प्रिन्स शुबमन गिलने अखेर तिसऱ्या क्रमांकावर तिहेरी आकडा गाठला आहे. त्याने कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर खेळताना 13 डावांनंतर शतकी खेळी केली. विशेष म्हणजे 2017 नंतरचं भारताकडून कसोटीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर भारतात खेळताना आलेलं हे पहिलंच शतक आहे. यापूर्वी चेतेश्वर पुजाराने 2017 मध्ये भारताकडून भारतात खेळताना शतक ठोकलं.

शुभमन गिलवर गेल्या काही दिवसांपासून टीका होत होती. जेव्हापासून शुभमन गिल हा कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला आहे. त्याच्या बॅटमधून धावांचा ओघ अटला होता. अखेर 13 डावांनंतर त्यांच्या बॅटमधून मोठी खेळी आली. त्याने संघ अडचणीत असताना शतकी खेळी करत भारताला दुसऱ्या कसोटीत चांगल्या स्थितीत पोहचवले.

शुभमन गिलचे हे 10 वे आंतरराष्ट्रीय शतक आहे. कसोटीत त्याने तीन शतके ठोकली आहेत. त्यातील दोन शतके भारतात आली आहे. गिलने वनडे क्रिकेटमध्ये 6 तर टी 20 मध्ये 1 शतक ठोकलं आहे.

या शतकासोबतच भारताकडून वयाच्या 24 व्या वर्षी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके ठोकणाऱ्यांच्या यादीत गिलने स्थान पटकावले आहे. या यादीत पहिल्या स्थानावर सचिन तेंडुलकर आहे. त्याने वयाच्या 24 व्या वर्षी 30 आंतरराष्ट्रीय शतके ठोकली होती. तर दुसऱ्या स्थानावर विराट कोहली आहे. त्याने 21 शतके ठोकली होती. 10 शतकांसह गिल तिसऱ्या स्थानावर आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT