Shubman Gill First ODI Century Celebration Video Gone Viral Zimbabwe Vs India 3rd ODI
Shubman Gill First ODI Century Celebration Video Gone Viral Zimbabwe Vs India 3rd ODI  esakal
क्रीडा

VIDEO | Shubman Gill : पहिल्या शतकानंतर गिलचे भन्नाट सेलिब्रेशन होतंय व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Shubman Gill First ODI Century Celebration : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने झिम्बाब्वेसमोर 290 धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून शुभमन गिलने दमदार शतकी खेळी केली. त्याने शेवटच्या षटकापर्यंत फलंदाजी करत 130 धावांची शतकी खेळी केली. विशेष म्हणजे शुभमन गिलने वनडे आंतरराष्ट्रीय कारकिर्दितील आपले पहिले वहिले शतक ठोकले.

शुभमन गिलने 82 चेंडूत आक्रमक शतकी खेळी केली. गिल पुढच्याच आठवड्यात 23 वर्षाचा होईल. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जानेवारी 2019 मध्ये पदार्पण केले. तेव्हापासून त्याने 11 कसोटीत सात तर वनडे क्रिकेटमध्ये 8 अर्धशतकी खेळी केल्या आहेत. गिन काही वेळा नव्वदीत देखील पोहचला होता मात्र त्याला शंभरचा आकडा पार करता आला नव्हता. मात्र झिम्बाब्वे विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात त्याने शंभरी पार केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले पहिले शतक पूर्ण केल्यानंतर शुभमन गिलने खास सेलिब्रेशन केले.

त्याने आपले हेलमेट काढून खाली झुकत सर्वांना अभिवादन केले. त्याने रॉबिन उथप्पा स्टाईलने आपले शतकी सेलिब्रेशन केले.

शुभमन गिलने 82 चेंडूत आक्रमक शतक पूर्ण केले. त्याने 50 व्या षटकापर्यंत फलंदाजी करत 130 धावा केल्या. त्यात 15 चौकार आणि एक षटकार मारला.

भारताने तिसऱ्या सामन्यामध्ये प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या जागी आवेश खान आणि दीपक चहर यांना संधी देण्यात आली. भारताकडून शुभमन गिलच्या साथीने खेळणाऱ्या इशान किशनने अर्धशतकी खेळी केली. तर सलामीवीर शिखर धवनने 40 आणि कर्णधार केएल राहुलने 30 धावांचे योगदान दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT