shubman gill out due to yashasvi jaiswal mistake rahul dravid got angry video ind vs sa 3rd t20 cricket news in marathi  sakal
क्रीडा

IND vs SA 3rd T20I : यशस्वी जैस्वालच्या चुकीमुळे शुभमन गिल झाला आऊट, कोच द्रविड राग अनावर... Video Viral

Kiran Mahanavar

IND vs SA 3rd T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना जोहान्सबर्ग येथे खेळला गेला. टीम इंडियाने अखेरच्या टी-20 लढतीत यजमान दक्षिण आफ्रिकेच्या संघावर 106 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. पण शुभमन गिल ज्या पद्धतीने आऊट झाला तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. आणि यशस्वी जैस्वालने शुभमन गिलसह डावाची सुरुवात केली. गिल सहा चेंडूत आठ धावा करून केशव महाराजच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात गिल चांगल्या टचमध्ये दिसत होता आणि तो मोठी खेळी खेळेल असे वाटत होते, पण तो लवकर बाद झाला.

खरं तर, ज्या चेंडूवर गिल आऊट झाला त्यावर तो नॉट आऊट होता. गिल एलबीडब्ल्यू आऊट झाला आणि डीआरएस न घेता पॅव्हेलियनमध्ये परतला. नॉन-स्ट्रायकर एंडला यशस्वी जैस्वालने त्याला रिव्ह्यू घेण्याचा सल्ला दिला नाही. आणि तो पॅव्हेलियनमध्ये परतला. नंतर, रिप्लेमध्ये असे दिसून आले की गिल आउट नव्हता नाही. कारण चेंडू स्टंपच्या बाहेर जात होता.

नंतर जेव्हा स्क्रीनवर रिप्ले दाखवला गेले तेव्हा टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या चेहऱ्यावर राग स्पष्टपणे दिसत होता. वास्तविक, जेव्हा एखादा फलंदाज फलंदाजी करत असतो, तेव्हा तो नॉन-स्ट्रायकर टोकाला उभ्या असलेल्या फलंदाजाचा सल्ला घेतो की डीआरएस घ्यायचा की नाही हे ठरवतो. गिल यांनीही तेच केले. चेंडू किती वळला आहे हे नॉन-स्ट्राइक एंडला उभा असलेला फलंदाज अधिक चांगल्या प्रकारे पाहू शकतो. मात्र, यशस्वीने येथे चूक केली आणि त्यामुळे गिल स्वस्तात बाद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : भारताच्या मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT