ICC Women's Players Smriti Mandhana
ICC Women's Players Smriti Mandhana  esakal
क्रीडा

Smriti Mandhana :स्मृतीची ICC Rankings मध्ये मुसंडी; T20 मध्ये कारकिर्दितील सर्वोत्तम कामगिरी

अनिरुद्ध संकपाळ

ICC Women's Players Smriti Mandhana : भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधनाने आज जाहीर झालेल्या आयसीसी महिला खेळाडू रँकिंगमध्ये धमाल केली. स्मृतीने टी 20 मध्ये कारकिर्दित पहिल्यांदाच रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. याचबरोबर स्मृती वनडे रँकिंगमध्ये देखील तीन स्थानांनी वर सरकली आहे. भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात स्मृती मानधना दमदार फलंदाजी करत आहे. इंग्लंड विरूद्धच्या तीन टी 20 सामन्यात तिने एकूण 111 धाा केल्या आहेत. या कामगिरीचा फायदा तिला आयसीसी रँकिंगमध्ये झाला.

स्मृती मानधना यापूर्वी वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर राहिली होती. तिने इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात 91 धावांची दमदार खेळी केली. या कामगिरीमुळे ती आता सातव्या स्थानावर पोहचली आहे. याचबरोबर टी 20 मध्ये स्मृतीचा पार्टनर सलामीवीर शेफाली वर्मा देखील टॉप टेनमध्ये सामील आहे. ती 666 गुण घेऊन सहाव्या स्थानावर आहे. वनडे रँकिंगमध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर देखील चार स्थानांची सुधारणा करत टॉप टेनमध्ये दाखल झाली आहे. ती सध्या 662 गुण घेऊन 9 व्या स्थानावर पोहचली आहे.

टी 20 अष्टपैलू खेळाडूंच्या रँकिंगमध्ये भारताची दिप्ती शर्मा देखील एक स्थान वर सरकली असून आता ती सहाव्या स्थानावर आहे. टी 20 रँकिंगमध्ये हरमनप्रीत कौर 14 व्या तर गोलंदाजीत वेगवान गोलंदाज रेणुका सिंह 10 व्या स्थानावर पोहचल्या आहेत. तर फिरकीपटू राधा यादव देखील चार स्थानांवर वर सरकत 14 व्या स्थानावर पोहचली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT