Snake Enter In Guwahati Stadium During India Vs South Africa 2nd T20I  esakal
क्रीडा

VIDEO | IND vs SA : पाऊस नाही मात्र सापानं थांबवला रोहित - राहुलचा धडाका

अनिरुद्ध संकपाळ

IND vs SA 2nd T20I Snake Enter In Stadium : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील गुवाहाटी येथे सुरू असलेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यावर पावसाचे सावट आहे. अशा परिस्थितीत भारतीय सलामीवीरांना प्रथम फलंदाजी करताना पॉवर प्लेमध्येच आक्रमक सुरूवात केली. मात्र सातव्या षटकानंतर खेळ काही खाळ थांबवावा लागला. मैदानात साप आला.

रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली होती. तोपर्यंत मैदानात सापाने एन्ट्री केल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. सापाला मैदानातून बाहेर काढेपर्यंत सामना थांबवण्यात आला. जे आफ्रिकेच्या गोलंदाजांना, पावसाला जमले नाही ते या छोटूश्या सापाने करून दाखवले. त्याने काही काळ का असेना रोहित - राहुलचा झंजावात रोखला. सामना थांबला त्यावेळी सात षटके पूर्ण झाली होती आणि भारताने बिनबाद 68 धावा केल्या होत्या.

दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी 20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पॉवर प्लेची आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांना भारताला पहिल्या 3 षटकात 21 धावांपर्यंतच मजल मारून देता आली. पहिल्या तीन षटकात फारसे हात खोलण्याची संधी न मिळालेल्या रोहित - राहुल जोडीने पुढच्या तीन षटकात तुफान फटकेबाजी करत भारताला 6 षटकात बिनबाद 57 धावांपर्यंत पोहचवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठरलं! निवडणूक आयोगाविरोधात विरोधक मैदानात उतरणार, १ नोव्हेंबरला मुंबईत महामोर्चाचं आयोजन, ठाकरे बंधू राहणार उपस्थित

Rohit Sharma ने वडापाव सोडला, तीन महिन्यांची न थकता ट्रेनिंग! ११ किलो वजन कमी करण्यामागचं गुपित अभिषेक नायरने उलगडलं

Crime News : किरकोळ वादातून चाकू हल्ला आणि खून! फरारी आरोपी राजूचा ११ वर्षांपूर्वीचा थरार; संजय पिसेंची यशस्वी उकल

Nashik Crime : ५० लाखांची लाच मागितली! नाशिकच्या सेंट्रल जीएसटी अधीक्षकाला सीबीआय कडून अटक, तात्काळ निलंबित

Lakshmi Pujan 2025 : लक्ष्मीपूजनाच्या या मंगल क्षणी... प्रियजनांना पाठवा लक्ष्मीपूजनाच्या मराठीतून खास शुभेच्छा, वाचा हटके संदेश

SCROLL FOR NEXT