sneh rana took 2 wickets for the 1st time t20
sneh rana took 2 wickets for the 1st time t20 sakal
क्रीडा

IND vs PAK : पाकिस्तानविरुद्ध Sneh Rana ने केली कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी

Kiran Mahanavar

IND-W vs PAK-W Commonwealth Games Womens 2022 : बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेतील करो या मरोच्या सामन्यात भारतीय गोलंदाजाचा भेदक मारा आणि उत्कृष्ट अशा क्षेत्ररक्षणासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 18 षटकात सर्वबाद 99 धावा केल्या. राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिल्या सामन्यात स्नेह राणाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध संधी मिळाली नाही, पण पाकिस्तानविरुद्ध या अष्टपैलू खेळाडूचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला.

स्नेह राणाने टी-20 कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. टी-20 तिने पहिल्यांदाच एका सामन्यात 2 बळी घेतले. त्याने 4 षटकात 15 धावा देत 2 बळी घेतले. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. कारण पहिल्याच दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला. पावसामुळे सामना 18-18 षटकांचा करण्यात आला. प्रथम खेळताना पाकिस्तानचा संघ 99 धावा करून सर्वबाद झाला. अशा प्रकारे भारतीय संघाला 100 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

पाकिस्तानने शून्य धावांवर पहिली विकेट गमावली. यानंतर सलामीवीर फलंदाज मुनिबा अली आणि कर्णधार बिस्माह मारूफ यांनी दुसऱ्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. दरम्यान ऑफस्पिनर स्नेह राणाने 9 व्या षटकात दोन्ही फलंदाजांना बाद करत संघाला मोठे यश मिळवून दिले. आधी त्याने मारुफला एलबीडब्ल्यू केले नंतर त्याने शेवटच्या चेंडूवर मुनिबाला त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT