saurav ganguli 
क्रीडा

सौरव गांगुलींनी राजीनामा दिलेला नाही; BCCIचं स्पष्टीकरण

सौरव गांगुलीच्या सोशल मीडिया पोस्टवरुन त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त प्रदर्शित झालं होतं.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सौरव गांगुली यांनी बीसीसीआयचं अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर आता बीसीसीआयनं यावर खुलासा केला आहे. सौरव गांगुली यांनी संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही, असं स्पष्टीकरण बीबीसीआयचे सरचिटणीस जय शहा यांनी दिलं आहे. (Sourav Ganguly has not resigned as president of BCCI clear by BCCI)

सौरभ गांगुलीने नुकत्याच केलेल्या एका ट्विटमुळं त्यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचा संभ्रम निर्माण झाला होता. आपण काहीतरी नवीन सुरू करणार असल्याचं त्यानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. लोढा समितीच्या शिफारसीनुसार तुम्ही बीसीसीआयमध्ये एखाद्या पदावर असेपर्यंत दुसरी कोणतीही गोष्ट करून शकत नाही. त्यामुळं लाभाच्या पदाचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. दरम्यान, सौरभ गांगुलीनं आपल्या पोस्टमध्ये नव्या इनिंगचे संकेत दिले आहेत. त्यामुळे त्याने बीसीसीआयचा राजीनामा तर दिला नाही ना? अशी चर्चा सुरू झाली होती.

गांगुलीनं काय केली होती पोस्ट?

"2022 मध्ये मला क्रिकेट जगतात 30 वर्षे पूर्ण होत आहेत. मी माझा क्रिकेटचा प्रवास 1992 मध्ये सुरू केला होता. क्रिकेटने मला खूप काही दिले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या सर्वांचा पाठिंबा मला मिळाला. माझ्या या प्रवासात माझ्यासोबत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे, मला समर्थन देणाऱ्या आणि मला मदत करणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानतो. तुमच्यामुळेच मी इथं पर्यंत पोहचलो आहे. आज मी काहीतरी नवीन करण्याची योजना आखत आहे. याचा फायदा लोकांना होईल. माझ्या या प्रवासात तुमचा पाठिंबा मला मिळेल अशी आशा आहे"

सौरभ गांगुलीच्या पोस्टमधील शेवटच्या ओळी लोकांसाठी काहीतरी करायचं आहे अशा आहेत. त्यामुळे तो राजकारणात जाणार का? अशी देखील चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच सौरभ गांगुली आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली होती. तसेच गांगुलीने त्यानंतर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींजी देखील भेट घेतली होती. त्यावेळी त्याने ही सदिच्छा भेट असल्याचे सांगत विषय टाळला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT