Virat Kohli 
क्रीडा

'विराटच्या राजीनाम्याचा निर्णय हा...', सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

सौरव गांगुलीने म्हटलं की, भारतीय कर्णधार म्हणून तिन्ही प्रकारात संघाला पुढे नेण्यात विराटने महत्त्वाची भूमिका बजावली.

भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाचा (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) विराट कोहलीच्या (Virat Kohli) राजीनाम्यानंतर ट्विटरवरून त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीचं कौतुक केलं आहे. सौरव गांगुलीने म्हटलं की, भारतीय कर्णधार म्हणून तिन्ही प्रकारात संघाला पुढे नेण्यात विराटने महत्त्वाची भूमिका बजावली. तसंच कर्णधारपदावरून हटण्याचा हा निर्णय त्याचा स्वत:चा होता असंही सांगितलं. विराट कोहलीने शनिवारी त्याच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला. जवळपास सात वर्षे त्यानं भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले. एक दिवस आधीच भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-१ ने पराभव पत्करावा लागला होता.

गांगुलीने ट्विटरवर बीसीसीआय़ आणि कोहली यांना टॅग करत म्हटलं की, विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने सर्व प्रकारात वेगाने प्रगती केली. राजीनामा देण्याचा निर्णय त्याचा वैयक्तिक आहे. बीसीसीआय़ त्याच्या या निर्णयाचे स्वागत करते. तसंच भविष्यात संघाला नव्या उंचीवर नेण्यासाठी त्याचं योगदान महत्त्वाचं असणार आहे. त्यानं एका महान खेळाडूची भूमिका उत्तमरित्या पार पाडली असंही गांगुली यांनी म्हटलं.

कसोटी कर्णधार म्हणून विराट कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने ६८ पैकी ४० कसोटीत विजय मिळवले आहेत. त्यानंतर महेंद्र सिंग धोनीचा नंबर लागतो. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २७ कसोटी जिंकल्या, तर गांगुलीच्या नेतृत्वाखाली २१ कसोटीत विजय मिळवला आहे. विराट कोहलीने सोशल मीडियावरून शनिवारी आपण कसोटीच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत असल्याचं सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१५ वर्षांपासून रखडलेलं काम पूर्ण होणार! मुंबई ते गोवा महामार्गासाठी नवीन अंतिम मुदत जाहीर; महत्त्वाची माहिती समोर

IndiGo Crisis: इंडिगो संकटानंतर भाडेवाढीवर सरकारचा चाबूक! मंत्रालयाकडून भाडे मर्यादा लागू; विमान कंपन्यांची मनमानी थांबणार

आणि घरी परतल्यावर बाबासाहेब पहिल्यांदा रडले... उत्कर्ष शिंदेने सांगितला महामानवाच्या आयुष्यातला तो किस्सा

माझंच लग्न आहे...; इंडिगोच्या गोंधळात नवरदेव अडकला विमानतळावर, VIDEO VIRAL

Sangli News : सांगलीत सतत पावसाला सामोरे जात शेतकऱ्यांनी ३३,३१० हेक्टर ऊस लागवड पूर्ण केली

SCROLL FOR NEXT