Sourav Ganguly Rahul Dravid esakal
क्रीडा

खेळाडू द्रविड अन् कोच द्रविडमध्ये झालाय एक बदल : सौरभ गांगुली

अनिरुद्ध संकपाळ

कोलकाता : बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीने (Sourav Ganguly) भारतीय वरिष्ठ संघाचा प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविड (Rahul Dravid) विषयी महत्वाचे विधान केले आहे. सौरभ गांगुलीने द्रविड हा कोच (Coach) म्हणून देखील यशस्वी ठरेल असा विश्वास दर्शवला आहे. सौरभ गांगुली आणि राहुल द्रविड यांनी अनेक दशके ड्रेसिंगरूम शेअर केली आहे. रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ संपल्यानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची निवड करण्यात सौरभ गांगुलीने मोठी भुमिका बजावली आहे.

सौरभ गांगुली कोलकात्यात झालेल्या एक प्रमोशनल इव्हेंटदरम्यान म्हणाला की, 'राहुल द्रविड ज्यावेळी खेळत होता त्यावेळी तो उत्कट, खोलात जाऊन विचार करणारा आणि अत्यंत व्यावसायिक होता. आता फक्त त्यात एकच बदल झाला आहे. त्याला भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागत नाहीये. मला असे वाटते की जगातील सर्वश्रेष्ठ गोलंदाजांचा सामना करणे खूप कठिण असते. बराच काळ त्याने त्याची भुमिका अगदी उत्तम प्रकारे पार पाडली.'

सौरभ गांगुलीचा बीसीसीआय अध्यक्ष म्हणून कार्यकाळ यंदाच्या वर्षी संपणार आहे. दरम्यान, गांगुलीने द्रविड भारतीय संघाचा कोच म्हणून चांगली कामगिरी करेल असे भाकित केले. तो म्हणाला, 'द्रविड एक कोच म्हणून देखील चांगली उल्लेखनीय कामगिरी करून दाखवेल. त्याच्याकडे गुणवत्ता आहे आणि तो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो.'

असे असले तरी सौरभ गांगुली राहुल द्रविडकडून लगेचच रिझल्ट देण्याची अपेक्षा करत नाहीये. तो म्हणाला, 'तो चुका करेल, प्रत्येक जण करतो. जेव्हा तुम्ही योग्य गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा तुम्हीला दुसऱ्यांपेक्षा जास्त यश मिळते.' असे असले तरी सौरभ गांगुली राहुल द्रविड आणि त्याच्या आधी असलेल्या कोचमध्ये तुलना करू इच्छित नाही. गांगुली याबबात म्हणला की, 'लोकांचा स्वभाव आणि व्यक्तीमत्व वेगवेगळे असते. एक व्यक्ती तुमच्यावर सतत भडीमार करत असतो ही त्याची ताकद आहे तर दुसरा सर्वश्रेष्ठ असलेला आपले काम शांततेत करतो. दोन व्यक्ती एकाच पद्धतीने यशस्वी होऊ शकत नाहीत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांनो लक्ष द्या! Meesho वरून खरेदी करता? तर आधी 'ही' बातमी नक्की वाचा; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Video: "मला नरेंद्र नावाचा तिरस्कार...", PM मोदींना भारतीय बॉक्सरने सांगितलेला पाकिस्तानी खेळाडूचा किस्सा ऐकून आवरेना हसू

Sugar Price: राज्यात साखरेचा तुटवडा, सणासुदीत भाव आणखी भडकण्याची शक्यता, किलोमागे किती मोजावे लागणार?

Samruddhi Mahamarg News: महामार्गावर नेमकं काय घडलं? RTO अधिकाऱ्यांनी केला मोठा खुलासा; म्हणाले, ''ट्रक चालकाने...''

Tukaram Mundhe: “चहा घेणार का? मी बनवतोय" FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ज्याच्यासाठी बनवला चहा तो मित्र कोण?

SCROLL FOR NEXT