Sourav Ganguly Google file photo
क्रीडा

'दादा' आज मुंबईत; T-20 वर्ल्डकप, IPL बाबत होणार चर्चा

१ जून रोजी आयसीसीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पूर्वनियोजित असलेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या नियोजनाबाबत आयसीसी बीसीसीआयशी चर्चा करणार आहे.

एएनआय वृत्तसंस्था

१ जून रोजी आयसीसीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पूर्वनियोजित असलेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या नियोजनाबाबत आयसीसी बीसीसीआयशी चर्चा करणार आहे.

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातल्याने सर्वच क्षेत्रांवर त्याचा परिणाम झाला. अनेक महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (Corona 2nd wave) थैमान घातल्याने भारतातील सर्वाधिक लोकप्रिय इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धाही स्थगित करण्यात आली. त्यामुळे जगभरातील क्रिकेट चाहते निराश झाले. आयपीएल कधी होणार याबाबत अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात ही स्पर्धा होणार असल्याची चर्चा आहे. यासाठीच बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली शुक्रवारी (ता.२८) सायंकाळी मुंबईत दाखल होणार आहेत. (Sourav Ganguly to reach Mumbai on Friday night for important meeting says BCCI SGM)

यंदा भारतात होणाऱ्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचं नियोजन, आयपीएलचे उर्वरीत स्पर्धा आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेबाबत चर्चा करण्यासाठी शनिवारी मुंबईत एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सौरव गांगुली मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या एक अधिकाऱ्याने एएनआय वृत्तसंस्थेला दिली.

आगामी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या नियोजनावर या व्हर्चुअल बैठकीत प्रामुख्याने चर्चा होईल. तसेच देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली. उर्वरीत स्पर्धा सुरू करण्याबाबतही बीसीसीआय राज्य क्रिकेट असोसिएशनशी चर्चा करणार आहे. १ जून रोजी आयसीसीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पूर्वनियोजित असलेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या नियोजनाबाबत आयसीसी बीसीसीआयशी चर्चा करणार आहे. या बैठकीला डोळ्यासमोर ठेवून राज्यात स्पर्धांचे आयोजन करण्याबाबत बीसीसीआय स्टेट असोसिएशनकडून माहिती घेईल. दुसरीकडे १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्याचा प्लॅनही बीसीसीआयचा आहे.

टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या नियोजनाबाबत याआधी झालेल्या बैठकीत बीसीसीआयने सामन्यांसाठी नऊ ठिकाणांवर शिक्कामोर्तब केलं होतं. विश्वकरंडक स्पर्धेचे सामने मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, धर्मशाला, अहमदाबाद आणि लखनऊ या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सर्व स्पर्धांचे आयोजन करणे हे बीसीसीआय पुढे आव्हान असेल. शनिवारी होणाऱ्या बैठकीत याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.

क्रीडा विश्वातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT