India womens cricket team e sakal
क्रीडा

टीम इंडियातील कोच नियुक्तीचा वाद; गांगुलीही झालेत नाराज!

या निर्णयानंतर बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरु झालेला वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत.

सुशांत जाधव

महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी डब्ल्यूव्ही रमन (WV Raman) यांच्या जागी रमेश पोवार (Ramesh Powar) यांची पुन्हा एकदा नियुक्ती झाली. क्रिकेट सल्लागार समितीने (CAC) रमेश पोवारांच्या नावाची शिफारस केली होती. या निर्णयानंतर बीसीसीआयच्या (BCCI) पदाधिकाऱ्यांमध्ये सुरु झालेला वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. महिला क्रिकेटमध्ये झालेल्या बदलामुळे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीही (Sourav Ganguly) नाराज झाले आहेत. रमण यांना रिटेन न करण्याचा निर्णय त्यांना रुचलेला दिसत नाही. एका पत्राच्या माध्यमातून यासंदर्भात त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समोर येत आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रमेश पोवार यांच्या नियुक्तीवर कोणतेही भाष्य केलेले नाही. पण आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय महिला संघाला फायनलपर्यंत घेऊन जाणाऱ्या प्रशिक्षकाला रिटेन केले जात नाही, याचे त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

भारतीय महिला संघाच्या काही वरिष्ठ सदस्यांनी कथित स्वरुपात रमन यांच्याविरोधात तक्रार केल्याची चर्चाही रंगली होती. त्यामुळेच त्यांच्या नावाचा विचार झाला नाही, असेही बोलले गेले. क्रिकेट सल्लागार समितीचे अध्यक्ष राहिलेल्या सौरव गांगुली यांनी सध्याच्या सल्लागार समितीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारतीय संघाच्या माजी क्रिकेटला पुन्हा रिटेन करायला हवे होते, असे त्यांना वाटते. रमन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियात झालेल्या टी20 वर्ल्डकपमध्ये फायनलपर्यंत मजल मारली होती. कोच पदाची नियुक्ती करण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने भारताचा दौरा केला. यात भारतीय महिला संघाला घरच्या मैदानात पराभवाची नामुष्की पत्करावी लागली होती.

मदनलाल, आरपीसिंह आणि सुरक्षणा नाईक यांच्या क्रिकेट सल्लागार समितीच्या निर्णयाचा गांगुलींना सन्मान करायला पाहिजे, असेही मत महिला क्रिकेटशी संलग्नित लोकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. महिला क्रिकेटच्या काँट्रॅक्टवरुनही अंतर्गत वाद असल्याचे बोलले जात आहे. गांगुलींनी मात्र नव्या करार योग्य असल्याचे म्हटले आहे. महिला संघाच्या कोच नियुक्तीसंदर्भात गांगुलींनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT