T20 World Cup South Africa vs Bangladesh sakal
क्रीडा

T20 World Cup : बांगलादेशचे अव्वल स्थानही गेले अन् रनरेटही झाले 'निगेटिव्ह'

दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला पायदळी तुडवले, गट-2 मध्ये अव्वल स्थान गाठले.

Kiran Mahanavar

T20 World Cup South Africa vs Bangladesh : टी-20 विश्वचषकाचा 22वा सामना दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेला. सिडनी येथे झालेल्या या गट-2 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 104 धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 बाद 205 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा डाव 16.3 षटकांत 101 धावांत गुंडाळला गेला. यासह आफ्रिकन संघ 3 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

बांगलादेशने पहिला सामना जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थानावर गेली होती, पण आज दक्षिण आफ्रिकाकडून पराभव झाला. यासह बांगलादेशचे अव्वल स्थानही गेले अन् रनरेटही झाले निगेटिव्ह झाला आहे.

रिले रोसोने सर्वाधिक 109 धावा केल्या. रिले रोसोने या टी-20 विश्वचषकात पहिले शतक झळकावले. या स्पर्धेच्या इतिहासात शतक झळकावणारा तो आपल्या संघाचा पहिला फलंदाज आहे. त्याचे टी-20 कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे. रोसोने 56 चेंडूंच्या खेळीत सात चौकार आणि आठ षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट 194.64 होता. याशिवाय क्विंटन डी कॉकने 38 चेंडूत 63 धावांची जलद खेळी खेळली. बांगलादेशकडून कर्णधार शकिबने बळी घेतले. तर तस्किन अहमद, हसन महमूद आणि अफिफ हुसैन यांनी 1-1 विकेट घेतली.

सामन्यात 206 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 16.3 षटकात 101 धावांवर गारद झाला. बांगलादेशला सुरुवातीपासूनच या सामन्यात पाय खोलात जात गेला. पहिली विकेट 26 धावांवर पडली, त्यानंतर विकेट्सची झुंबड उडाली. फक्त लिटन दास 34 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaishvary Thackeray: बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाची सायबर फसवणूक, एकाच रात्रीत सहा वेळा संशयास्पद व्यवहार; परदेशातून घडली घटना

Khadakwasla Dam Water Level : खडकवासला धरणसाखळीत 80.19 टक्के पाणीसाठा; पवना, मुळशी धरणात किती पाणी? पुण्यावर ओढवणार पाणीकपातीचं संकट?

Vande Bharat Sleeper: मुंबई-नागपूर वंदे भारत स्लीपर कधी धावणार? मुंबई-बंगळुरूला मिळाली हिरवा झेंडा ;उपराजधानीची उपेक्षाच

Latest Marathi News Live Update : जळगावात खासगी पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीत गोळीबार; विद्यार्थ्यांची धावपळ

Sangli District Bank Election Result : सांगली जिल्हा बँकेच्या विजयी उमेदवारांची यादी; गोपीचंद पडळकर, संजय काका पाटलांचा जिल्हा बँकेत प्रवेश

SCROLL FOR NEXT