South Africa Captain Temba Bavuma Statement About Umran Malik Threat  
क्रीडा

कर्णधार बावुमाचा इशारा; उमरानसारख्यांची गोलंदाजी खेळतच मोठे झालोय

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : 5 टी 20 सामन्यांची मालिका (T20 Series) खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) संघ भारतात दाखल झाला आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या संघात आयपीएलमध्ये सनराईजर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या उमरान मलिकचा (Umran Malik) देखील समावेश आहे. 150 किमी प्रतीतास वेगाने गोलंदाजी करणाऱ्या उमरान मलिकबद्दल दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाला (Temba Bavuma) विचारल्यानंतर त्याने आम्हाला अशी वेगवान गोलंदाजी (Fast Bowling) खेळण्याची सवय आहे असे सांगितले.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी 20 सामन्याची सुरूवात 9 जून पासून होत आहे. दिल्लीत पहिला टी 20 सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बावुमाने पत्रकारांशी संवाद साधताना उमरान मलिक बद्दल वक्तव्य केले. तो म्हणाला, 'आमच्या संघाला वेगवान मारा खेळण्याचा अनुभव आहे. आमचे फलंदाज वेगवान मारा खेळतच मोठे झाले आहेत. मला नाही वाटत की आमच्या संघातील कोणता फलंदाज 150 किमी प्रती तास वेगाने येणारा चेंडू खेळण्यासाठी घाबरत असेल. तुम्ही जितकी तयारी करायची आहे करा आमच्याकडेही 150 किमी प्रती तास वेगाने गोलंदाजी करणारे गोलंदाज आहेत. आमच्याकडेही असे शस्त्र आहे.'

मालिका सुरू होण्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बावुमाने असे वक्तव्य करत भारतीय संघाला एक प्रकारे आव्हानच दिले आहे. बावुमाने एक प्रकारे आपल्या फलंदाजांचा उत्साह वाढवण्याचाच प्रयत्न केला आहे. भारताने पहिल्यांदाच आयपीएलमधील स्टार तीन गोलंदाजांना संघात सामिल केले आहेत. भारतीय संघात या मालिकेसाठी उमारन मलिक, आवेश खान आणि अर्शदीप सिंह यांचा समावेश करण्यात आला आहे. या तिघांनी आयपीएलमध्ये प्रभावी मारा करत निवडसमितीचे लक्ष आपल्याकडे वेधले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: मालक समजणाऱ्यांना हटवा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गणेश नाईकांवर टीका, गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही !

Latest Marathi News Live Update : भाजपच्या नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी घेतला पदभार

BMC Election: महापालिकेच्या रणांगणात जुने खेळाडू पुन्हा मैदानात! अनुभवाला की नव्या चेहर्‍यांना संधी?

Mumbai Municipal Election : निवडणूक प्रचारात कार्यकर्त्यांची खाण्यापिण्याची ऐश; कार्यकर्त्यांच्या पोटाचा मार्ग 'पक्षाच्या' तिजोरीतून!

Baramati News : बारामतीच्या उपनगराध्यक्षपदी कोणाला संधी? 16 जानेवारीला होणार निवड

SCROLL FOR NEXT