Mike Procter Dies Marathi News 
क्रीडा

Mike Procter Dies : क्रिकेट विश्वात पसरली शोककळा! 'या' दिग्गज क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

South African Legendary All Rounder Mike Procter Dies :क्रिकेट विश्वात पुन्हा शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचे निधन झाले होते, आता दक्षिण आफ्रिकेच्या महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक माइक प्रॉक्टर यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले.

Kiran Mahanavar

South African Legendary All Rounder Mike Procter Dies : क्रिकेट विश्वात पुन्हा शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचे निधन झाले होते, आता दक्षिण आफ्रिकेच्या महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक माइक प्रॉक्टर यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. माइक प्रॉक्टर यांनी दक्षिण आफ्रिकेतील डरबन येथील त्यांच्या घराजवळील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

प्रॉक्टरची पत्नी मरिना यांनी शनिवारी रात्री उशिरा दक्षिण आफ्रिकन प्रेसला या बातमीची पुष्टी केली. प्रॉक्टरच्या पत्नीने सांगितले की, माइकवर शस्त्रक्रिया झाली होती, त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. त्यात त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

माइक प्रॉक्टर त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. या अनुभवी खेळाडूने 2002 ते 2008 दरम्यान आयसीसी मॅच रेफरी म्हणून काम केले होते. यापूर्वी हा दिग्गज दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा मुख्य प्रशिक्षकही होता.

माईक प्रॉक्टरची क्रिकेट कारकीर्द

1970 आणि 1980 च्या दशकात दक्षिण आफ्रिकाचा संघ क्रीडा क्षेत्रापासून लांब होता, त्यामुळे प्रॉक्टरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द कमी झाली. तो दक्षिण आफ्रिकेकडून फक्त 7 सामने खेळला. हे सर्व 1966-67 आणि 1969 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळले गेले. या कालावधीत त्याने 15.02 च्या सरासरीने 41 विकेट घेतल्या. त्याने दक्षिण आफ्रिकेला सातपैकी सहा कसोटी सामने जिंकून दिले, तर एक सामना अनिर्णित राहिला.

माइक प्रॉक्टर त्याच्या चेस्ट-ऑन ॲक्शनसाठी आणि त्याच्या डिलिव्हरी स्ट्राईडमध्ये लवकर चेंडू सोडण्यासाठी ओळखला जातो. वर्णभेदानंतरच्या काळात दक्षिण आफ्रिका संघाचे पहिले प्रशिक्षक असण्यासोबतच माइक प्रॉक्टर हे इंग्लिश काउंटी ग्लुसेस्टरशायरशीही संबंधित होते. प्रशिक्षक म्हणून माइक प्रॉक्टर यांनी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 1992 क्रिकेट वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीपर्यंत नेले होते. त्यानंतर प्रॉक्टरने 2002 ते 2008 दरम्यान आयसीसी मॅच रेफरी म्हणून काम केले.

माइक प्रॉक्टरची देशांतर्गत कारकीर्द चांगली होती. प्रॉक्टरने 401 प्रथम श्रेणी सामने खेळले, 48 शतके आणि 109 अर्धशतकांसह 36.01 च्या सरासरीने 21,936 धावा केल्या. या काळात त्याने 19.53 च्या सरासरीने 1,417 विकेट्सही घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Mahadev Munde Case: परळी येथील महादेव मुंडे खूनप्रकरणी विजयसिंह बांगरचा जबाब नोंदविला

SCROLL FOR NEXT