South Africa Heinrich Klaasen Retires From Test Cricket News Marathi 
क्रीडा

Heinrich Klaasen News : दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! वर्ल्ड कपमध्ये घाम फोडणाऱ्या यष्टीरक्षकाने कसोटी क्रिकेटला अलविदा

South Africa Heinrich Klaasen Retires From Test Cricket News |

Kiran Mahanavar

Heinrich Klaasen Retires News : दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठा झटका बसला आहे. अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेनने कसोटी फॉरमॅटला अलविदा केला आहे. तो संघासाठी केवळ चार कसोटी सामने खेळला आहे. या काळात त्याच्या बॅटमधून आठ डावांत 13.0 च्या सरासरीने 104 धावा आल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची वैयक्तिक सर्वोत्तम फलंदाजी 35 धावांची होती.

हेनरिक क्लासेनने कसोटी क्रिकेटला नक्कीच अलविदा केला आहे, पण दक्षिण आफ्रिकेसाठी पांढऱ्या चेंडूवर तो खेळत राहील. 32 वर्षीय फलंदाजाने शेवटचा कसोटी सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून तो पुन्हा आफ्रिकन कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी धडपडत होता. अनुभवी फलंदाज डीन एल्गरनंतर नवीन वर्षात कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेणारा तो दुसरा फलंदाज आहे.

क्रिकेट आफ्रिकेच्या आगामी कसोटी क्रिकेटच्या योजनांमध्ये क्लासेनचा सहभाग नव्हता असे नाही. वृत्तानुसार, यावर्षी वेस्ट इंडिज आणि बांगलादेशमध्ये खेळल्या जाणार्‍या कसोटी सामन्यांसाठी त्याच्या नावाची चर्चा होणे अपेक्षित होते, परंतु आता त्याने स्वतःला त्या शर्यतीतून पूर्णपणे काढून टाकले आहे.

2023 मध्ये हेनरिक क्लासेनच्या बॅटमधून 69 चौकार आणि 40 षटकार मारले आहेत. त्याचवेळी, हेनरिक क्लासेन या वर्ल्ड कपमध्ये सातत्याने चमकदार फलंदाजी केली. हेनरिक क्लासेनने बांगलादेशविरुद्ध 49 चेंडूत 90 धावांची खेळी केली. त्याने आपल्या झंझावाती खेळीत 2 चौकार आणि 8 षटकार मारले. याआधी हेनरिक क्लासेनने इंग्लंडविरुद्ध शानदार शतक झळकावले होते. हेनरिक क्लासेनने इंग्लंडविरुद्ध 67 चेंडूत 109 धावा केल्या होत्या. त्या डावात त्याने 12 चौकार आणि 4 षटकार मारले.

हेनरिक क्लासेनच्या ODI आणि T20 च्या कामगिरीबद्दल सांगायचे तर, सध्या तो संघाचा महत्त्वाचा भाग आहे. क्लासेन आफ्रिकेसाठी आतापर्यंत एकूण 54 एकदिवसीय आणि 43 टी-20 सामने खेळला आहे. या कालावधीत, त्याने 50 एकदिवसीय डावांमध्ये 40.07 च्या सरासरीने 1723 धावा आणि 39 टी-20 डावांमध्ये 22.56 च्या सरासरीने 722 धावा केल्या. क्लासेनच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये चार शतके आणि सहा अर्धशतके आहेत आणि टी-20मध्ये चार अर्धशतके आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला डावलून शुभमन गिलला संधी; मांजरेकर बसरले, 'हा अन्याय आहे...'

Viral: पतीने गर्भनिरोधक गोळी खरेदी केली, ऑनलाइन पैसे दिले, पण एक छोटी चूक अन् पत्नीसमोर अनैतिक संबंधाचे बिंग फुटले!

Latest Marathi News Updates : ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Shirur Crime : मेडिकल चालकाची डॉक्टरला शिवीगाळ करीत पट्ट्याने मारहाण; डॉक्टर जखमी

SCROLL FOR NEXT