South Africa Vs India 1st Test India Playing 11 esakal
क्रीडा

SA vs IND 1st Test Playing 11 : रोहितला एका वरिष्ठ खेळाडूचं मन दुखवावं लागणार; प्लेईंग 11 निवडताना डोकेदुखी वाढणार

दुसरा सलामीवीर कोण, मोहम्मद शमीच्या ऐवजी कोणाला संधी... रोहितसमोर प्रश्नांची मोठी यादी

अनिरुद्ध संकपाळ

South Africa Vs India 1st Test India Playing 11 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे आणि टी 20 मालिकेनंतर आता दोन कसोटी सामन्यांची मालिका 26 डिसेंबरपासून सुरू होत आहे. हा सामना सेंच्युरियनवरील सुपर स्पोर्ट्स पार्कवर होत आहे. कसोटी मालिकेसाठी दिग्गज खेळाडू विश्रांती घेऊन संघात परतले आहेत. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मासमोर प्लेईंग 11 मध्ये कोणाला संधी द्यायची आणि कोणाला नाही हा मोठा प्रश्न असणार आहे.

भारतीय संघाच्या गोलंदाजी विभागाबद्दल बोलायचं झालं तर मोहम्मद शमी दुखापतीमुळे दौऱ्याला मुकला आहे. त्यामुळे त्याची कमी कोण भरून काढणार हा मोठा प्रश्न संघ व्यवस्थापनापुढे असणार आहे. मोहम्मद शमीच्या जागी मुकेश कुमार की प्रसिद्ध कृष्णा कोण खेळणार हे ठरवावं लागेल.

दुसरीकडे खेळपट्टी पाहता रोहित शर्माला एका फिरकीपटूला संघातून वगळावे लागणार असं दिसतंय. रोहित शर्माला रविंद्र जडेजा आणि आर अश्विनपैकी एकाची निवड करावी लागले. डावखुरी फलंदाजी करण्याचा फायदा जडेजाला होऊ शकतो. त्यामुळे अश्विनवर बेंचवरच बसण्याची वेळ येऊ शकते.

ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे कसोटी मालिकेला मुकणार आहे. त्यामुळे रोहितला आता सलामीला कोणासोबत यायचं हे ठरवावं लागणार आहे. रोहितसोबत यशस्वी जयस्वाल सलामीला योग्य पर्याय वाटतोय. शुभमन गिल हा कसोटीत तिसऱ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार केएल राहुल कसोटीत देखील विकेटकिपिंग करण्यास सज्ज झाला आहे. तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो.

प्रसिद्ध कृष्णा पदार्पण करणार?

रोहित शर्मासमोर बुमराह - सिराज जोडीसोबत तिसरा वेगवान गोलंदाज कोण हा सर्वात मोठा प्रश्न आहे. शार्दुल ठाकूर हा चौथा वेगवान गोलंदाज म्हणून संघात असेल. त्याची कसोटीत फलंदाजी देखील उपयुक्त ठरते. मात्र तिसऱ्या वेगवान गोलंदाजासाठी मुकेश कुमार आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यात चुरस आहे. प्रसिद्ध कृष्णाने कसोटी पदार्पण अजून झालेलं नाही.

भारताची संभाव्य प्लेईंग 11 :

  • रोहित शर्मा

  • यशस्वी जयस्वाल

  • शुभमन गिल

  • विराट कोहली

  • श्रेयस अय्यर

  • केएल राहुल

  • रविंद्र जडेजा

  • शार्दुल ठाकूर

  • जसप्रीत बुमराह

  • मोहम्मद सिराज

  • प्रसिद्ध कृष्णा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT