South Africa Vs India 2nd T20I : डकवर्थ लुईस नियमानुसार दक्षिण आफ्रिकेसमोर आलेल्या 15 षटकात 152 धावा करण्याचे आव्हान आले होते. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेने 5 फलंदाजांच्या मोबदल्यात 13.3 षटकातच पार केलं. रिझा हेड्रिक्सने 49 धावांची दमदार खेळी केली. त्याला कर्णधार माक्ररमने 30 धावांचे योगदान देत चांगली साथ दिली. या विजयाबरोबरच दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे.
क्लासेन बाद झाल्यानंतर मिलर आणि स्टब्सने 18 चेंडूत 24 धावा असा सामना आणला. त्यानंतर 13 व्या षटकात एक षटकार मारून षटक मोठं करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मिलरला मुकेशने बाद केलं.
रिझा आणि माक्ररम यांनी 8 षटकात 1 बाद 96 धावा केल्यानंतर भारताने जोरदार कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. आधी माक्ररम 30 धावा करून त्यानंतर रिझा 49 धावांवर बाद झाला. कुलदीप पाठोपाठ मोहम्मद सिराजनेही आफ्रिकेला धक्का दिला. त्याने क्लासेनला 7 धावांवर बाद केले.
धडाकेबाज सुरूवात करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने आपला हा बाऊंड्रीचा धडाका कायम ठेवला. त्यांनी पहिल्या 6 षटकातच 78 धावा चोपून काढत सामन्यावर आपली पकड निर्माण केली. रिझा हेंड्रिक्सने 19 चेंडूत नाबाद 40 धावा ठोकल्या तर माक्ररमने 10 चेंडूत 17 धावा करत त्याला चांगली साथ दिली.
रिझा हेंड्रक्स आणि मॅथ्यू ब्रीड्झकी यांनी धडाकेबाज सुरूवात करत 2.5 षटकातच 41 धावा कुटल्या. मात्र जडेजा आणि तिलक वर्मा यांनी मिळून 7 चेंडूत 16 धावा ठोकणाऱ्या मॅथ्यूला धावबाद केलं.
भारताच्या डावातील तीन चेंडू शिल्लक असतानाच पाऊस आल्याने बराच वेळी वाया गेला. त्यानंतर पाऊस थांबला अन् दक्षिण आफ्रिकेसमोर डकवर्थ लुईस नियमानुसार 15 षटकात 152 धावांचे आव्हान ठेवण्यात आले.
पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात फलंदाजीला आलेल्या रिंकू सिंहने 39 चेंडूत नाबाद 68 धावा करत भारताला 19.3 षटकात 180 धावांपर्यंत पोहचवले. मात्र भारताचा डाव संपण्यापूर्वीच पावसाने हजेरी लावली.
सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर रिंकू सिंहने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने दमदार अर्धशतक ठोकत भारताला 150 परा पोहचवले.
सूर्यकुमार यादवने कर्णधाराला साजेशी खेळी करत 36 चेंडूत 56 धावा ठोकल्या. त्याने आधी तिलक वर्मासोबत 49 आणि नंतर रिंकू सिंहसोबत 70 धावांची भागीदारी रचली. यामुळे भारतीय संघ 14 षटकात 125 धावांपर्यंत पोहचू शकला.
तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवने तिसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी रचली. मात्र ही भागीदारी कोटझीने फोडली. त्याने वर्माला 29 धावांवर बाद केले.
पहिल्या दोन षटकातच भारताला दोन धक्के बसल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माने आक्रमक फलंदाजी करत षटकात धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजी करताना पहिल्या दोन षटकात भारताला दोन धक्के दिले. पहिल्याच षटकात मार्को येनसनने यशस्वी जैसवालला बाद केलं. त्यानंतर पुढच्याच षटकात शुभमन गिलला विलियम्सने शुन्यावर बाद करत भारताला दुसरा धक्का दिला.
ऋतुराज गायकवाड हा आजरपणामुळे आजचा सामना खेळणार नाहीये. त्याच्या ऐवजी शुभमन गिल हा यशस्वी जयस्वालसोबत सलामीला येईल. विकेटकिपर म्हणून इशान किशनच्या ऐवजी जितेश शर्माला संधी देण्यात आली आहे.
दुसऱ्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. माक्ररमचा ढगाळ वातावरणाचा फायदा उचलण्याचा मानस आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.