South Africa vs India 2nd Test  Sakal
क्रीडा

RSA vs IND : टीम इंडिया जिंकेल का? आकडेवारीत दडलंय उत्तर

सुशांत जाधव

South Africa vs India 2nd Test : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर 240 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाला नवा इतिहास रचायचा असेल तर आता सर्वकाही गोलंदाजांच्या हाती आहे. पहिल्या डावात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला 227 धावात रोखले होते. अशीच किमया दुसऱ्या डावात केली तर भारतीय संघ विक्रमी मालिका विजयाची नोंद करु शकतो. सध्याच्या परिस्थितीत भारतीय संघ हा सामना जिंकू शकतो का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. याच उत्तर तुम्हाला जोहन्सबर्गच्या Wanderers मैदानातील आकडेवारीवरुन मिळू शकते. (South Africa vs India 4th innings chases at Wanderers Record)

जोहन्सबर्गच्या मैदानात चौथ्या डावात 310 धावा करण्याचा विक्रम आहे. 2011-12 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ही कामगिरी नोंदवली गेली होती. या दोन्ही संघादरम्यान चौथ्या डावात 2005-06 धावांत 292 धावा झाल्या होत्या. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात आलेल्या 2005-06 च्या दौऱ्यात चौथ्या डावात 217 धावांची नोंद झाल्याचा इतिहास आहे. 240 किंवा त्यापेक्षा अधिक टार्गेट असताना भारतीय संघाविरुद्ध केवळ दोन संघांनी विजय नोंदवलाय. यात ऑस्ट्रेलियाने 1977-78 मध्ये 339 धावा करुन टीम इंडियाला दोन विकेट्सने पराभूत केले होते. तर वेस्ट इंडीजने 276 धावा करत 1987-88 मध्ये दिल्लीचे मैदान मारले होते.

चौथ्या डावात दक्षिण आफ्रिकेचा रेकॉर्ड

240 किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने घरच्या मैदानात एकमेव विजय मिळवला आहे. 2001-02 मध्ये आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 335 धावा करुन विजय नोंदवला होता. ही आकडेवारी भारतीय संघासाठी ऐतिहासिक विजयाला खुणावणारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT