South Korea Son Heung-min trains with protective mask FIFA World Cup 2022 kgm00 
क्रीडा

FIFA World Cup : दक्षिण कोरियाया संघ बाद फेरी गाठेल; हुकमी खेळाडू सुन ह्युंग मीन याचा विश्वास

सुन ह्युंग मीनवर महिन्याच्या सुरुवातीला शत्रक्रिया झाली होती.

Kiran Mahanavar

FIFA World Cup : दक्षिण कोरियाचा स्टार फुटबॉल खेळाडू आणि टोटेनहॅमकडून आक्रमक फळीत खेळणाऱ्या सुन ह्युंग मीनने आपला संघ यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेची बाद फेरी गाठेल, असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. सुन ह्युंग मीनवर महिन्याच्या सुरुवातीला शत्रक्रिया झाली होती. चेहऱ्यावर झालेल्या या शत्रक्रियेनंतर आता तो संघाबरोबर आहे. कतारची राजधानी असणाऱ्या दोहामध्ये तो उतरला असता पत्रकारांशी संवाद साधताना त्याने दक्षिण कोरियाचा संघ बादफेरी गाठेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

हेही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

याबाबत अधिक बोलताना तो म्हणाला की, ‘चेहऱ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर संघाबरोबर विश्वकरंडक खेळू शकेन की नाही, याबाबत माझ्या मनात सुरुवातीला शंका होती; तरी अजूनही माझे सहकारी आणि मी दुखापतीवर लक्ष ठेवून आहोत. विश्वकरंडकात खेळणार, यावर मी ठाम आहे. संघाला कसा विजय मिळवता येईल आणि आमच्या पाठीराख्यांना कसे खुश ठेवता येईल, यासाठी मी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार आहे. आमचा ज्या ह गटात समावेश आहे, तो गट अतिशय कठीण असून आम्ही नक्कीच स्पर्धेची बाद फेरी गाठू, याबद्दल सहकाऱ्यांमध्ये आणि माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे.’

सुन ह्युंग मीनला मार्सेलविरुद्धच्या चॅम्पियन्स लीग सामन्यात खेळताना चेहऱ्याला दुखापत झाली होती. दुखापतीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो आता दोहामध्ये संघाशी जोडला गेला असून त्याच्या चेहऱ्यावर एक विशिष्ट पद्धतीचा मास्क आहे. हा त्याचा सलग तिसरा विश्वकरंडक असून त्याने देशाकडून १०४ आंतरराष्ट्रीय सामने खेळताना ३५ गोल केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaghcha Raja Look: लालबागचा राजा २०२५ चा पहिला लूक समोर, प्रथम दर्शनातून दिसली पहिली झलक, पाहा व्हिडिओ

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

AUS vs SA, ODI: दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव, तरी जिंकली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; पाहा काय झाले रेकॉर्ड

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Nagpur Fraud;'बेटिंग ॲप’द्वारे किराणा व्यापाऱ्याची २६ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT