भारत-न्यूझीलंड मालिकेसाठी प्रेक्षकांची मैदानात उपस्थिती ?
भारत-न्यूझीलंड मालिकेसाठी प्रेक्षकांची मैदानात उपस्थिती ? sakal
क्रीडा

भारत-न्यूझीलंड मालिकेसाठी प्रेक्षकांची मैदानात उपस्थिती ?

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) १७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत-न्यूझीलंड मालिकेसाठी प्रेक्षकांना परवानगी देणार आहे. ‘‘या मालिकेसाठी प्रेक्षक मैदानात पूर्ण क्षमतेने प्रवेश करू शकतील अशी आशा आहे,’’ असे मंडळाचे प्रमुख सौरव गांगुली यांनी शनिवारी म्हटले आहे. कसोटी मालिका आयोजित करणाऱ्या राज्य संघटनांनीही त्या-त्या राज्यांतील कोरोना शिष्टाचारांचे पालन करून प्रेक्षकांना ‘विशिष्ट प्रमाणात’ स्टेडियममध्ये गर्दीची परवानगी दिली जाईल, असे सूचित केले आहे.

या दौऱ्याची सुरुवात १७ नोव्हेंबरला ट्वेन्टी-२० मालिकेने होणार असून जयपूर येथे पहिल्या सामन्याचे आयोजन करण्यात येईल, त्यानंतर रांची आणि कोलकता येथे पुढील सामने खेळले जातील. त्यानंतर २५ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरदरम्यान कानपूर आणि मुंबई येथे दोन सामन्यांची कसोटी मालिकाही खेळविली जाणार आहे.

‘‘आम्ही कोरोना शिष्टाचार आणि नियमांबद्दल राज्य सरकारच्या संपर्कात आहोत. प्रेक्षकांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची असेल आणि सर्व शिष्टाचार पाळले जातील याची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू,’’ असे राज्य संघटनेच्या अधिकाऱ्याने यावेळी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताच्या सलामीवीरांची दणक्यात सुरुवात, 5 ओव्हरमध्येच पूर्ण केल्या 60 धावा

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT